मार्क्सचा डायलेक्टिकल गुरू

Date: 
रवि, 11 ऑगस्ट 2013

जनी वाद सोडूनि द्यावा।
जनी सूखसंवाद सूखे करावा।
जगीं तो चि शोकसंतापहारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी।।109।।
गेल्या श्र्लोकाच्या शेवटी ‘तुटे वाद संवाद तो हीतकारी’ अशी ओळ आहे. ही चौथी ओळ, एकशे आठ ते एकशे बारा या पाच श्र्लोकांत आलेली आहे. मनाच्या श्र्लोकात चौथी ओळ कायम ठेवणारी काही महत्त्वाची स्तबके आहेत. त्यात हे स्तबक महत्त्वाचे आहे.

मनाचा बदल घडला की, शरीर कसे बदलते त्याबद्दल तीन श्र्लोक संपल्याबरोबर हे महत्त्वाचे घोषवाक्य श्रीरामदासांनी आपल्यापुढे ठेवले आहे. वाद संवाद हा हितकारी आहे. याचा अर्थ असा की, ‘वादे वादे जायते तत्वबोध: ‘ दुसरा अर्थ असा की , “वाद संवाद” आपण म्हणतो तेव्हा दोन परस्परविरोधी शक्तींचा उल्लेख करतो. “वादामध्ये” विरोध सूचित होतो. तर “संवादात” समतोल बोलणे सूचित होते. अशा दोन परस्परविरोधी ज्ञानशिखरांच्या टोकातून सत्य हाती गवसेल, असे श्रीरामदासांचे म्हणणे आहे. मार्क्सने एकोणिसाव्या शतकात डायलेक्टिकल मटेरियलिझमबद्दल जे विश्र्लेषण केले, ते भारतीय संस्कृतीवर आधारलेले होते, असे मार्क्सच्याच काही अनुयायांनी म्हटले आणि त्यावर लिहिलेल्या ग्रंथाने वादळ उत्पन्न केले.
“वाद-संवादातून, विरोध-विकासातून उन्नतीची कल्पना” श्रीरामदासांच्या या चौथ्या ओळीत कशी दिसते, ते पाहण्याजोगे आहे. मात्र वादविवादाची पथ्ये या एकशेनवव्या श्र्लोकात सांगितली आहेत. जाहीर वादविवाद, हजार लोकात वादविवाद हा करू नये असा पहिल्या ओळीचा अर्थ नव्हे. कारण दुसरी ओळ हेच सांगते की जनामध्ये सुखसंवाद करावा. म्हणजे असे की आरडाओरडा टाळून संवाद शांत व्हावयाचा असेल तर तो निवडक वादप्रेमीत होऊ शकतो. एरवी गोंधळ, गडबड होते. याचे अधिक विवेचन पुढल्या श्र्लोकात होते.

मनोबोधाचे ओवीरूप
स्त्रीकारणें परमार्थ बुडविला। प्राणी स्वहितास नाडला।
ईश्र्वरी कानाकोंडा जाला। स्त्रीकारणें कामबुध्दी।।
स्त्रीकारणें सोडिली भक्ती। स्त्रीकारणें सोडिली विरक्ती।
स्त्रीकारणें सायोज्य मुक्ति। तेही तुच्छच मानिली।।
येक स्त्रियेवाचेनि गुणें। ब्रह्मांड मानिले ठेंगणें।
जिवलगें ती पिसुणें। ऐसी वाटली।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView