माशी शिंकली व मेली!

Date: 
रवि, 27 जुलै 2014

जणें भक्षिका भक्षिली जाणिवेची।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची।
अहंभाव ज्या मानसीचा विरेना।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना।।159।।

एखादे काम व्हावयाचे नसले, म्हणजे ‘माशी शिंकली’ असे आपण म्हणतो. ज्ञान घेता घेता माणसाला अहंकार झाला, म्हणजे तेथे अहंकाराची माशी शिंकल्यासारखीच झाली आणि तो अहंकार स्वत:चाच असल्यामुळे, पोटातच असल्यामुळे, तिथली माशी फार काळ जिवंत राहू शकणार नाही. ती मरणारच. पोटात मेलेली माशी असली म्हणजे काय होते ते तुम्हाला माहीत आहेच. खाल्लेले सुग्रास अन्न वमनक्रियेने बाहेर पडते; तीच उपमा श्रीरामदासांनी येथे दिली आहे.
जाणीवेची ‘मक्षिका’ म्हणजे माशी तुमच्या पोटात जाऊ नये, असा समर्थांचा अभिप्राय आहे. आता वरवर पाहताना असे वाटेल की जाणिवेला म्हणजे ज्ञान होण्याला, म्हणजे ज्ञानाला, श्रीरामदासंाचा आक्षेप आहे. त्याच अर्थाने त्यांनी एकशे छपन्नाव्या श्र्लोकात जाणत्याला मूर्ख म्हटले आहे. पण तेथेच सूक्ष्म ज्ञानाची महती सांगितली आहे.

एकशे सत्तावन्नाव्या श्र्लोकात शास्त्राच्या अभ्यासाला विरोध आहे असे वरवर वाटते; पण तेथेही ‘प्रबोध’ ह्या शब्दाने सूक्ष्म ज्ञानाचे निराळेपण सांगितले आहे. त्याच चालीवर ह्या श्र्लोकातसुध्दा ज्ञान हे माशीसारखे अहंकार गुणामुळे विषरूप होईल असे सुचविले आहे. अहंकार र्उीा झाला की विष संपले. केवळ ज्ञान उरले. ह्या ज्ञानाचा सूक्ष्म मार्ग पुढील श्र्लोकात उजळून निघाला आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
आतंा आम्ही काय खावें। किती उपवासी मरावे।
ऐसियाचे संगतीस देवें। कां पां घातलें आम्हांसी।
ऐसे आपुलें सुख पाहती। परी त्याचें दु:ख नेणती।
आणि शक्ति गेलियां अंती। कोणीच काम न येती।
असो ऐसी वाट पाहतां। दृष्टी देखिला अवचिता।
मुलें धावती ताता। भागलास म्हणौनी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView