मोहरा भरलेला हंडा!

Date: 
रवि, 15 एप्रिल 2012

मोहरा भरलेला हंडा!
मना पाविजे सर्व ही सूख जेथें।
अती आदरें ठेविजे लक्ष तेथें।।
विवेकें कुडी कल्पना पालटीजे।
मना ससज्जना राघवीं वस्ति कीजे।।40।।्र
एक लोभी मनुष्य रोज जमीन उकरून मोहरांचा हंडा पहात असे. तोंडातोंड भरलेला तो मोहरांचा हंडा पाहून त्या लोभ्याला मोठा आनंद व्हायचा. तसा तो लोभी मोठा रामभक्तही होता. मोठा म्हणजे मोठेपणा मिळवण्यापुरता असेच केवळ नव्हे. त्या लोभ्याने पूर्वी प्रतिज्ञा केली, हंडाभर मोहरा मिळाल्या की, मी रामभक्तीकडे वळेन. मोहरांचा हंडा भरल्यावर हा लोभी रामभक्तीकडे अधिक वळला. आणि मग त्याला खरोखरीच एक वेगळे समाधान वाटू लागले. तरी सुध्दा दिवसातून हा एकदा ‘हंडा पाहण्याचा’ क्रम चालूच होता.
एक दिवस राम या लोभ्याच्या स्वप्नात आले. तो हंडा उलटा करून त्यांनी दाखवला. त्यात पहिला थर फक्त मोहरांचा होता. बाकी खाली माती भरली होती. त्या लोभ्याच्या मुलाने खालच्या मोहरा काढून घेतल्या होत्या. तो लोभी रडायला लागला. तेव्हा राम म्हणाले, “अरे बाबा! तू इतके दिवस मोहरांचा वरचा थरच पाहून खूष होत होतास ना? तुला मी खरी गोष्ट सांगितली की, हंडा तोंडाखाली रिकामा असूनसुध्दा तू वर सुख मानत होतास; तसेच तुझ्या देहाचेही आहे. तुझा देह सुख साधनांनी काठोकाठ भरलेला आहे तू मानतो आहेस तेही समाधान खोटे आहे. हंडा भरलेला आहे अशी कल्पना करून घेऊन तू माझे नित्य स्मरण करत होतास. तेवढ्यानेही तचला समाधानाचा अनभव आला ना? तो आता अधिकाधिक आणि खराखुरा घे. “
लोभ्याचे डोळे उघडले. स्वप्नातून, झोपेतून खरेखुरे उघडले. त्याने रामस्मरणाचा थोडा अनुभव आधीच घेतला होता. आता विवेकाने कुडीकल्पना म्हणजे देहकल्पना त्याने पालटून टाकली. आणि मनाने रामाबद्दलचा आदर वाढवला. मनाला रामस्थित करून सुख मिळवले. तोच या श्लोकाचा आशय आहे.

मनाचे ‘अभंग’रूप
दाही दिशा मना धावसी तू सईरा। न चुकती येरझार कल्पकोटी।
विठोबाचे नामी दृढधरी भाव। येर सांडी वाव मृगजळ।।2।।
भुक्ति मुक्ति सिधिद जोडोनिया कर। करिती निरंतर वळगणे।।3।।
नामा म्हणे मना धरी तू विश्वास।। मग गर्भवास नव्हे तुज।।4।।
- नामदेव महाराज

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView