राग कोठे राहतो?

Date: 
रवि, 21 ऑगस्ट 2011

मनाचे श्लोक
राग कोठे राहतो?
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी।।
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरू दंभरू।।6।।

राग हा नेहमी चांगल्या हेतूने धरला, तर त्यात वाईट काय आहे असा प्रश्र्न नेहमी पडतो. मुलगा खोटे बोलला तर रागावू नये का? त्याने अभ्यास केला नाही तर रागावू नये का? मित्राला उसने दिलेले पैसे त्याने वेळेवर परत केले नाहीत, तर त्याला गोडीने संागून काय उपयोग आहे? ते रागाचे कैवारी बिनतोड प्रश्र्न विचारण्याच्या अभिमानात उभे ठाकतात.

मुलगा खोटे बोलतो, ते बरोबर नाही. पण या मुलाला खोटे बोलायला कोणी शिकवले? प्रथम मुलगा खोटे बोलला तेव्हा आई-वडील किंवा मोठी माणसे कोणीतरी त्याचे कौतुक करतात आणि त्यातून त्या मुलाला खोट्याची चटक लागते. खोटे बोलण्याचे फायदे चटकन दिसतात. म्हणून त्याचा मोह आवरत नाही, मोठ्या माणसांना तो आवरत नाही, तर लहान मुलांना कसा आवरणार? आणि आपल्याच गुणाचे अपरिहार्य प्रतिबिंम मुलात दिसल्यावर मागून रागावून उपयोग काय? निदान जोपर्यंत आपण सत्यसंकल्प धरत नाही, तोपर्यंत राग किंवा रागाचे सोंग हा सुध्दा दुटप्पीपणा आहे. आणि म्हणून तो बरोबर नाही. त्याच्या अलीकडला कामविकार तर सर्व विकारांचे मूळ. अर्थात् येथे त्याचा वासनात्मक काम असा विस्तृत अर्थ घ्यावयास हवा.

विकारांची दोन अंगे रामदासांनी तिसऱ्या व चौथ्या ओळीत सांगितली आहेत. ती म्हणजे मद आणि मत्सर. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या कर्तबगारीबद्दल जी असूया वाटते, तिचे नाव मत्सर. आणि आपल्यापेक्षा धाकट्या माणसाच्या चुकीबद्दल जी तुच्छता वाटते तिचे नाव मद. हे दोन्ही विकार चुकीचे आहेत आणि अनावश्यक आहेत. आपली कर्तबगारी ही कणाकणाचे वाढत असते. तेव्हा खालच्याबद्दल तुच्छता दाखवू नये आणि त्याच कारणाने वरच्याबद्दल मत्सर बाळगू नय, हा मनाला केलेला गोड उपदेश आहे.

कम क्रोध विकारांचे दुष्परिणाम गीतेच्या बासष्ट, त्रेसष्ठाव्या श्लोकात दाखवले. त्या विकारांपासून मुक्ती ही परमशांती म्हणून संागितली. आणि ती शांती न मिळवलेल्या माणसाबद्दल सहासष्ठावा श्लोक सांगतो की, विकारशून्य स्थिरबुध्दी नसेल, त्याला सुखशांती मिळणार नाही.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView