रामाचा जवळचा पत्ता

Date: 
रवि, 25 जाने 2015

लपावें अती आदरें रामरूपीं।
भयातीत निश्र्चित ये सस्वरूपी।
कदा तो जनी पाहता ही दिसेना।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना।।185।।

श्रीरामदास ब्रह्माच्या दर्शनाकडून या श्र्लोकात रामदर्शनाकडे वळत आहेत. श्रीरामदासांनी एखादा विशिष्ठ गुरू सर्वस्वाने केला असे दिसत नाही. मागील श्र्लोकात सांगितल्याप्रमाणे जेथे ‘संत’भेटले, ताथे त्यांनी ‘सत्’ घेतले. गुरू शोधावा म्हणून सांगितले. त्यांची लक्षणेही सांगितली. पण सामान्य माणसाला आदर्श गुरू कोठे शोधता येईल? ही अडचण श्रीरामदासांपुढे होती आणि म्हणून, गुरूचाही गुरू किंवा आदर्श असा जो प्रकट ब्रह्म राम, त्याचा पत्ता श्रीरामदास येथे सांगत आहेत.

अत्यंत आदराने रामाच्या रूपात लपावये, असे पहिली ओळ संागते. आता पुन्हा शंका डोकावेल की, ब्रह्म जर दिसत नाही, तर राम प्रकट कसा?

म्हणून लगोलग दुसरी ओळ सांगते की याबद्दल कोणतेही भय किंवा शंका न बाळगात, निश्र्चित रूपाने, स्वत:च्या अंतरंगात डोकावून पहा. म्हणजे, राम तेथेच तुम्हाला स्वत:च्या रूपात भेटेल.

हा केलेला अर्थ बरोबर आहे की नाही, अशी माणसाला शंका येईल. म्हणून मुद्दाम तिसरी व चौथी ओळ अधिक स्पष्टता करते की, या प्रकट रामाला तुम्ही जनात म्हणजे लोकात पाहायला जाल, मनुष्य लोकात पाहायला जाल, तर तो दिसणार नाही आणि चौथी ओळ सांगते की, त्याच्याशी सदैव एकरूपतेने पाहिले, स्वत:पेक्षा तो भिन्न नाही अशा दृष्टीने पाहिले, तर त्त्याचा अनुभव येतो.

राम आणि ब्रह्म, याची एकत्रता तर येथे आली आहे; पण खऱ्या शोधक जिज्ञासूचीही एकता राम आणि ब्रह्माबरोबर श्रीरामदास करून देत आहेत. सगळे काही भिन्न आहे, हा आपला भाव असतो. तो भिन्न भाव काढून टाकला, की सत्य गवसेल. तेच ब्रह्म, तोच राम.

मनोबोधाचे ओवीरूप
ऐसा मनीं प्रस्तावला। क्षण येक उदास जाला।
सवेंचि प्राणी झळंबला। मायाजाळें।।
कन्यापुत्रें आठवली। मनीहुनि क्षिती वाटली।
म्हणे लेकुरें अंतरली। माझी मज।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView