रामाचे मोठेपण कोठे?

Date: 
रवि, 31 जुलै 2011

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढें वैखरी राम आधी वदावा ।।
सदाचार हा थोर सांडूं नये तो ।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ।।३।।
...................

राम हा एक आदर्श पुरूष होता. जन्मला उत्तर टोकाला. आजूबाजूला प्रदेश आपल्या पराक्रमाने लहानपणीच त्याने निर्भय केला. मग वडिलांची अज्ञान पाळण्याच्या निमित्ताने दक्षिणेकडल्या वनात तो आला. रामासारखा शूर पुरूष त्या वनात ठाणा मांडून बसला, की आपोआपच तो प्रदेश अधिक निर्भय होई. मनुष्य वस्तीला योग्य होई.

पण एवढ्या गतीने सगळ्या हिंदुस्थानचा उद्धार कसा होणार? मग सीतेला पळवून नेण्याची घटना घडली. ज्याने ती पळवली, तो नेमका हिंदुस्थानच्या दक्षिण टोकाचा राजा. त्याच्या पराभवासाठी रामाचे आंदोलन सुरू झाले. नर वानरांच्या संघटना बांधल्या गेल्या, तेजाने तापवल्या गेल्या. अन्यायाची संताप बलदंड बळ बांधतो. त्या बळाने बलभीमाची उड्डाणे झाली. कल्पक इंजिनिअर्सनू पूल बांधले. म्हमून रामाचा पराक्रम समुद्रपार गेला.

संकटाचे निमित्त करून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत रामाने सारा भारत उठवला, पिंजून काढला. आपल्यावर व्यक्तिशः आलेल्या संकटाचे निमित्त करून, सगळा समाज त्याने शूर बनवला. सत्य, शौर्य, संघटना चातुर्य, सनापतित्व आणि मनाच्या निश्चयाचे आदर्श प्रतीक या नात्याने राम प्रातःस्मरणीय झाला. तीच प्रातःस्मरणीयता मनाच्या तिसऱ्या श्लोकात आहे. तेथे सांगितले आहे की, सकाळी रामाचे नाव घ्या, पण नंतर दिवसभर सुद्ध वैखरी म्हणजे वाणीने, नामस्मरण करूनच व्यवहार करा.

बायको गेल्यामुळे सामान्य माणसाप्रमाणे रामही वेडापिसा बुद्धिनाश त्याच्या चरित्रातही दिसतो. पण पुढे युद्धकांड एकशेवीसप्रमाणे रामाने ‘रावणाचा अहंकारनाश हाच सीताहरणानंतरच्या घटनांचा मुख्य हेतु सांगितला आहे. आणि सीता ही लोकोपवादाच्य निमित्ताने का होईना, शुद्ध झाल्यावरच पत्करली आहे.

सारांश, रामासारखा उच्च आदर्श नसेल तेव्हा काम, क्रोध, बुद्धिनाश या गीतेच्या श्लोकातील अधःपातच्या पायऱ्या सामान्य माणसाचा नाश घडवून आणतील. अलट रामाच्या जीवनात वरवर दिसणार काम, क्रोध,रामाला मर्यादा पुरूषोत्तम या पदवीपर्यंत पोहचवितो. याचे कारण रामाचे मन सदाचारसंपन्न आहे. त्याचा हेतु लोककल्याणाचा आहे. म्हणून या तिसऱ्या श्लोकात रामस्मरणाचे पावित्र्य म्हणजे सदाचार प्रतीकाचे सतत स्मरण, असा मानसवैज्ञानिक अर्थ आहे आणि त्यातून चौथ्या ओळीतील यश-धन्यता अपरिहार्य आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView