राम, विठ्ठल आणि शंकर

Date: 
रवि, 17 फेब्रु 2013

विठोनंें शिरीं वाहिला देवराणा।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा।
निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी।।84।।

एकदा श्रीरामदास पंढरपूरला गेले होते, विठ्ठलमूर्तीकडे पाहू लागले आणि विचारू लागले, “रामा तू इथे कसा उभा? “ श्रीरामाशी श्रीसमर्थ एकरूप झाल्याची ही कथा आपल्याला पूर्वीच माहीत आहे. येथे मात्र त्याची दुसरी बाजू दिसते.
श्रीरामदासंानी विठ्ठलमूर्तीकडे आणि विठ्ठल परिरात किती सूक्ष्मपणे पाहिले, हे त्यावरून दिसून येईल. पंढरपूरला विठ्ठलाच्या मूर्तीवर शिवलिंगाचे प्रतीक आहे; तिकडे श्रीरामदासांचे बारकाईने लक्ष होते. त्याचा उल्लेख श्रीरामदास या श्लोकात करीत आहेत.
श्रीविठ्ठल श्रीशंकरांना शिराधार्य मानतात आणि पूर्वीच्या श्लोकात आपण पाहिले आहे की, स्वत: श्रीशंकर श्रीरामाचे ध्यान करतात. श्रीसमर्थाच्या काळाआधीपासूनच विठ्ठल हे महाराष्ट्राचे दैवत आहे. म्हणून रामादासंाचा येथे मुद्दाम उल्लेख आहे की विठ्ठल ज्याला मानतात, तो शंकर अखेर रामाचे ध्यान करतो.

श्रीरामशक्तीचे हे श्रेष्ठत्व या श्लोकाच्या तिसऱ्या व चौथ्या ओळीत पुन्हा श्रीरामदासांनी स्पष्ट केले आहे.
तिसऱ्या ओळीत स्वत:च अतिशय तापसी अशा शंकराचा उल्लेख आहे आणि त्यांनाही श्रीरामांनी शांत केले, असे चौथी ओळ संागते, मात्र ती चौथी ओळ शंकरांनाच उद्देशून नाही, तर तो एक सर्वसाधारण काढलेला सारांश आहेह. त्याचे रहस्य आपल्याला पुढच्या श्लोकात मिळेल.

ज्ञानेश्वरी मानस
(‘उद्योगसिध्दि मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 8 श्लोक 17ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे)
एवढे अहोरात्र जेथींचे। तेणे न लोटती जे भाग्याचे।
देखती ते स्वर्गीचे। चिरंजीव।।157।।
अर्थ: जेथे दिवसरात्रीचे मान आहे, तेथील भाग्यवान पुरूष मरत नाहीत, तर ते स्वर्गातले चिरंजीव होऊन सर्व पाहात असतात.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView