राम सर्वत्र कसा?

Date: 
रवि, 12 एप्रिल 2015

नभी वावरे जो अणूरेणू कांही।
रिता ठाव या राघवेवीण नाही।
तया पाहतां पाहतां तेचि जाले।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडालें।।196।।

महात्मा गांधींना कोणीतरी विचारले होते की, तुम्ही दशरथाचा मुलगा जो राम, त्यालाच मानता का? महात्माजींनी उत्तर दिले होते की, मूळ जी सर्वपूर्ण सर्वत्र अशी जी शक्ति नांदते की जिचे नाव दशरथाने आपल्या मुलाला दिले, तिला मी मानीन, वास्तविक श्रीरामदाससुध्दा अगदी पहिल्या श्र्लोकापासून एकशे त्र्याण्णवाव्या श्र्लोकापर्यंत रामाचे वर्णन अनेकदा निर्गुण असेच करीत आहेत. तेव्हा अणुरेणुत भरलेल्या अस्तित्वालाच एकदा राम म्हटले, म्हणजे मतभेद उरू नयेत.
आज विज्ञान म्हणते की, या जगात कोठेही पोकळी नाही. “देअर इज नो व्हॅक्युम इन दि युनिव्हर्स” आकाशत तुम्हाला प्रचंड पोकळी दिसते, पण तो भास आहे. विज्ञानाच्या नियमाप्रमाणेही जगाच्या सर्व दिशांत जेथे ‘काही नाही‘अशी जागाच नाही. अशा सर्व दिशांत, प्रत्येक कणात जे काय आहे, त्या शक्तीचे, वस्तूचे नावच राम ठेवल्यावर मतभेद उरू नयेत. म्हणून हा श्र्लोक ठसठशीतपणे सांगतो आहे की, या आकाशात वावरणारा अणुरेणु राममय आहे. त्याचे जर चिंतन तुम्ही कराल, तर तेथे सर्व लक्ष्य किंवा लक्ष्यशून्यता (म्हणजे सर्व दृश्य अदृश्यता) नाहिशी होईल.

तुम्हाला न दिसणाऱ्या शून्यरूपाचे ध्यान तुम्ही करा. किंवा त्याला राम म्हणून, त्याच वर्णनाचे सूक्ष्म रूप पाहा. दोन्हीचे फळ एकच आहे, असे मानसशास्त्रही म्हणते. (अधिक संदर्भ “रीडिंग्ज इन परसेप्शन” टी 306, पान 71-72)

मानस ज्ञानेश्र्वर
(‘धान्यसमृध्दी’ मंत्र, या साधनेसाठी अध्याय 9, श्र्लोक 20ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
यजन करिता कौतुकें। तिही वेदांचा माथा तुके।
क्रिया फळेसि उभी ठाके। पुढां जयां।।308।।
अर्थ: यज्ञक्रिया पाहून वेदत्रयीसुध्दा संतोषाने मान डोलावते, आणि यजनक्रियेचे फळ ज्यांच्यापुढे मूर्तिमंत उभे राहते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView