लहानाचे मोठेपण

Date: 
रवि, 15 डिसें 2013

हॉलंड देशाला लागून असलेला समुद्र काही ठिकाणी जमिनीपेक्षा उंचावर आहे. अशा ठिकाणी तेथे भिंती एक दिवस अशा भिंतीजवळून जाताना एका छोट्या मुलाला एक छोटे भोक पडलेले दिसले,. त्यातून पाणी वहात होते. या मुलाने मनात विचार केला, “असेच पाणी रात्री झिरपेल तर ते भोक वाढेल, भिंतही फुटेल आणि सर्वत्र पाणीच पाणी पसरेल. “ त्या मुलाने आपली चिमुकली बोटे त्या फटीत सारली आणि ती फट बंद केली. रात्रभर तो मुलगा तसाच कुडकुडत बसला होते. पाश्चात्य देशता केवढी थंडी असते, हे आपल्याला माहीतच आहे. पण प्राणाची पर्वा न करता या देशभक्त मुलाने लोकांचे रक्षण केले. सकाळी त्याचे साऱ्यांनी केवढे कौतुक केले असेल त्याची तुम्हीच कल्पना करा.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView