लाडू गोड लागतो

Date: 
रवि, 3 मार्च 2013

मुखे राम विश्राम तेथेंचि आहे।
सदानंद आनंद सेऊनी राहे।
तयावीण तो सीण संदेहकारी।
निजधाम हें नाम शोकापहारी।।86।।
गोड लाडू खाल्ला आणि मग साखर टाकलेल्या दुधाचा घोट घेतला तरी ते दूध काही गोड लागत नाही. कारण विज्ञानाप्रमाणे संबंध जिभेला सर्व चवी आहेत अशी आपली समज असते, ती खोटी आहे. जिभेच्या विशिष्ट भागात विशिष्ट चव लागू शकते. तेव्हा गोड चव ही जिभेच्या विशिष्ट भागातच लागते. तो भाग एकदा चवीने पुरा भरून गेला की, निराळ्या प्रकारची कमी गोड वस्तू तेथे आपला ठसा चटकन उमटवू शकणार नाही. पण याचा एक निराळा अर्थ असा की, एखादा उच्च प्रतीचा सुखाचा घोट घेतल्यावर कमी प्रतीचे सुख त्यापुढे तुच्छ तरी असते, किंवा त्यात समाविष्ट तरी असते.

साखरटंचाईच्या दिवसांत एका महिलेने सुचवले होते की, चहात साखर न घालता जिभेवर पाव चमचा आधी खावी, म्हणजे चहात साखर नाही, हे फारसे भासणार नाही. भौतिक आणि मानसशास्त्रीय सत्य असेच आहे. म्हणून या श्लोकांची पहिली आणि दुसरी ओळ म्हणते की, प्रथम मुखाने रामनाम सुरुवात करा. त्यामुळे शांती प्राप्त होईल, आणि त्याच्या सवयीने त्या आनंद स्थितीत तुम्हाला सतत राहता येईल. याशिवाय इतर काही शंका धुंडीत फिरणे म्हणजे त्रासाला आमंत्रण देणे आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
गर्भीं म्हणे सोहं सोहं। बाहेरी पडतां म्हणे कोहं।
ऐसा कष्टी जाला बहु। गर्भवासी।।
दु:क वरपडा होता जाला। थोरा कष्टी बाहेरी आला।
सवेंच कष्ट विसरला। गर्भवासाचे।।
सुंन्याकार जाली वृत्ती। कांही आठवेना चित्तीं।
अज्ञानें पडिली भ्रांती। तेणे सुखचि मानिले।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView