वकील आणि चोराची गोष्ट

Date: 
रवि, 8 जून 2014

बहूतां परी कूसरी तत्त्वझाडा।
परी पाहिजे अंतरी तो निवाडा।
मना सार साचार तें वेगळें रे।
समस्तांमधें येक तें आगळें रे।।152।।

एक होते वकील. चोरीचा आरोप असलेल्या एका अशिलाला त्यांनी चोरीच्या आरोपातून सोडवले. वकिलाची शंका होती की चोराने चोरी केली आहे. तरी पण त्याने आपले कौशल्य पणाला लावले आणि आरोपी सुटल्याबरोबर वकील त्याला फी मागू लागला. वकिलाने चोराला बजावले, ‘कोठेतरी तू धन दडवून ठेवले आहेस. ‘ चोराने शांतपणे उत्तर दिले, ‘वकीलसाहेब, तुमचे बचावाचे भाषण ऐकण्यापूर्वी मलाही वाटत होते की मी चोरी केली आहे म्हणून. पण आता माझी खात्री झाली की, मी मुळीच चोरी केली केलेली नाही!

मग तुम्हाला जास्ती देऊ कोठून? ‘बिचारा वकील मुकाट्याने गप्प बसला. शब्दाने पटविलेली खात्री नेहमीच उपयोगी पडत नाही.
श्रीरामदास पहिल्या ओळीत म्हणत आहेत की, शब्दाचा कीस काढून तत्त्वाचा झाडा पुष्कळ केला, पण मनाला तो पटला नसला तर फळ कसे मिळणार? तिसऱ्या ओळीत श्रीरामदास म्हणत आहेत की मनाला सत्य माहीत असते ते वेगळेच असते. आणि ती मानसिक जाण ही सर्व ज्ञानामध्ये अधिक निश्र्चित अशी गोष्ट आहे. ब्रह्माचे ज्ञान करून घ्यायचे झाले तर एका दृष्टीने ते फार सोपे आहे.
ते प्रत्येकाच्या आवाक्यातलेही आहे. पण त्याचे वर्णन करणे प्रत्यक वेळा शक्य आह असा हट्ट कोणी धरू नये. झोपेची शांती प्रत्येकाने अनुभवलेली असते; पण त्या शांतीची सुरुवात, मध्य आणि शेवट ह्याचे संपूर्ण वर्णन करू शकणारे शब्द आपल्याला मिळू शकतील काय?

अखेर ती शब्दापेक्षा अनुभवाचीच गोष्ट ठरते.

मनोबोधाचे ओवीरूप
भरम आहे लोकाचारी। पहिली नांदणूक नाही घरी।
दिवसेंदिवस अभ्यांतरी। दरिद्र आले।।
ऐसी घरवात वाढली। खाती तोंडे मिळाली।
तेणें प्राणीयांस लागली। काळजी उद्वेगाची।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView