वाचन, चिंतन, वर्तन..

Date: 
रवि, 24 मे 2015

वाचन, चिंतन, वर्तन..
मना गुज रे तूज हें प्राप्त जालें।
परी अंतरी पाहिजे येत्न केले।
सदा श्रवणें पाविजे निश्र्चयासी।
धरी सज्जनसंगती धन्य होसीं।।202।।

रामशक्तीचा खरा अर्थ आपण श्र्लोक एकशे नव्वद ते एकशे शहाण्णवपर्यंत पाहिला आहे. या पार्श्र्वभूमीवरच श्रीरामदासांना झालेले रामाचे दर्शन समजून घ्यावयास हवे. तसे घेण्याचा प्रयत्न हा श्र्लोक करीत आहे. त्याचा भावार्थ असा की, ‘हे मना, तुला जरी हे सगळे गुह्यज्ञान प्राप्त झाले असले तरी तू आपला प्रयत्न सोडू नको. नेहमी चांगले श्रवण करण्याची, निश्र्चय टिकविण्याची, सज्जन संगतीत राहण्याची, तू आस धर. म्हणजे धन्य होशील. ‘

मनोबोधाचे ओवीरूप
ऐसा आनंद मानिला। दु:ख सर्वही विसरला।
तव तो गल्बला जाला। परचक्र आलें।
अकस्मात धाडी आली। कांता बंदी धरून नेली।
वस्तभावही गेली। प्राणीयाची।।
तेणें दु:ख जालें भारी। दीर्घ स्वरें रुदन करी।
मनी आठवे सुंदरी। गुणवंत।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView