वाद आणि विवाद फरक

Date: 
रवि, 18 ऑगस्ट 2013

तुटे वाद संवाद त्याते म्हणावे।
विवेके अहंभाव यातें जिणावें।
अहंतागुणे वाद नाना विकारी।
तुटे वाद संवाद हीतकारी।110।।

गेल्या श्र्लोकामध्ये लोकांमध्ये विवाद करू नये असे सांगितले आहे; तर दुसऱ्या ओळीत लोकांमध्ये बसून संवाद करावा असे म्हटले आहे. श्रीरामदास किती सूक्ष्म बोलत आहेत पहा. निवडक-ज्ञानप्रेमींमध्ये चर्चा व्हावी; नुसत्या अतिसंख्येचा समूह, विद्येचा प्रेमी असेलच असे नाही. श्रीसमर्थांचे दुसरे पथ्य असे की विवाद करू नये;पण संवाद करावा. आता ‘वादविवाद’आणि ‘वादसंवाद’असा गेल्या श्र्लोकाच्या पहिल्या दोन ओळीत फरक केला आहे. तो का? त्याचे विवेचन हा श्र्लोक करतो.
‘शिवाजी महाराजांना गाता येत होते का? ‘याची हेतूशून्य चर्चा करण्यात अर्थ काय? त्यात कोणाचीही काही मते, कोणाची काही माहिती, यांचा गदारोळ, वादविवाद माजायचा. पण शिवाजी महाराजांची रणनीती, समाजनीति, राजनीति, इत्यादी गोष्टींवर चर्चा केली तर त्यातून नवीन माहिती मिळेल. आजच्या काळाला योग्य काय ते दिसेल. आणि त्यातून वागण्याचा मार्ग मोकळा होईल.
आगरकर आणि टिळक यांचे वाद झाले. राजकीय कार्य आधी की सामाजिक कार्य आधी, याबद्दल त्यांचा वाद-संवाद झाला.संवाद हा समाजवादाशी सुबध्द असतो. मूळ वादासाठी जो पक्ष असतो, त्याच्याच तोलाचा, समतोल प्रतिवाद म्हणजे संवाद. तसा वादसंवाद नचिकेत यमात झाला, राम वसिष्ठात झाला, कृष्ण अर्जुनात झाला. आगरकर टिळकात झशला. हे सर्व वाद हितकारी ठरले. कारण त्या वादात विवेक होता. फारशी अहंता नव्हती हीच पथ्ये हा श्र्लोक सांगतो.

मनोबोधाचे ओवीरूप
ऐसी अंतरप्रीति जडली। सर्वस्वाची सांडी केली।
तव मरोन गेली। अकस्मात भार्या।
तेणें मनीं शोक वाढला। म्हणे थोर घात जाला।
आता कैंचा बुडाला। संसार माझा।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView