वाद विवादाचे मूळ ब्रह्म हवे

Date: 
रवि, 8 जुलै 2012

वाद विवादाचे मूळ ब्रह्म हवे
क्रमी वेळ जो तत्वचिंतनानुवादे।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे।
करी सूखसंवाद जो ऊगमाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।52।।

डायलेक्टिक्स हा एक महत्त्वाचा शब्द गेल्या शतकात संदर्भप्राप्त झाला. त्या संदर्भात पहिल्या ओवीतील तत्वचिंतनानुवाद हा शब्द महत्त्वाचा आहे. तत्वाचे चिंतन करून त्याप्रमाणे आयुष्य घालवायचे, त्याचा अनुवाद करायचा, हे पहिल्या ओळीत अभिप्रेत आहे. अनुवादामध्ये नुसते हुकूम ऐकणे नव्हे, वादही नव्हे, तर संवाद किंवा सुसंवाद असा अभिप्राय घ्यावयास हवा.

दुसऱ्या ओळीत वादविवाद हा याचा तर स्पष्ट उल्लेखच आलेला आहे. आणि तिसऱ्या ओळीत आपण लावलेला अनुवाद, शब्दाचा अर्थ, बरोबर आहे. मात्र हा वाद किंवा संवाद कशाबद्दल याची तिसऱ्या ओळीतील खूण विसरू नये. रामाचा उत्तम शिष्य म्हणवून घ्यावयाचे असेल तर वरवरचा वाद किंवा संवाद व्यर्थ आहे. वाद, चिंतन, चर्चा जी काय व्हावयाची ती विश्वाच्या मूलभूत कारण आणि रचनेबद्दल व्हावयाची. ज्याला या मूळ कारणपरंपरेत रस असेल, त्याचे आयुष्य सफल होते. दासबोधाच्या विसाव्या दशकात आणि चौथ्या समासात दहावा अखेरचा श्लोक म्हणतो, “परब्रह्म पोकळ घनदाट! ब्रह्म सेवटाचा सेवट।।” ब्रह्माचे मूळ येथे शोधले गेले. ब्रह्म म्हणजे शेवटाचा शेवट. जेथे संपूर्ण नवी जाणीव जन्मते, तेथे ब्रह्म जन्माला येते. या जन्माचे चिंतन करण्याचे भाग्य रामाच्या सर्वोत्तम भक्तालाच येणारे, असे हा श्लोक सांगतो.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘मृत्यु शोक मुक्ती’मंत्र या साधनेसाठी, अध्याय8श्लो.7ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
आणि मरणी जया जे आठवे। तो तेचि गतीते पावे।
म्हणोनि सदा स्मरावे। मातेचि तुवा।।75।।
अर्थ: असा नियम आहे की, मरतांना ज्याचे स्मरण होते, त्याच्याच जन्माला जीव जातो, म्हणून तू नेहमी माझेच स्मरण ठेवावेस.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView