व्यवहारात कसे वागावे?

Date: 
रवि, 15 फेब्रु 2015

देहेभान हें ज्ञानशास्त्रें खुडावें
विदेहीपणें भक्तिमार्गेचि जावें।
विरक्तीबळें निंद्य सर्वे तजावे।
परी संग सोडूनि सूखें रहावें।।188।।

गेल्या श्र्लोकापासून एकशे नव्वदाव्या श्र्लोकापर्यंत, म्हणजे चार श्र्लोकांची चौथी ओळ एकच आहे. ब्रह्म जाणण्यासाठी योग्य अशी पार्श्र्वभूमी तयार केल्यावर हे चार श्र्लोक उपाय सांगत आहेत. व्यवहारात मनाने वागावे कसे, हे सांगत आहेत. मागल्या श्र्लोकात

बाहेरच्या वस्तुमध्ये ब्रह्म असले तरी पाहाता का येणार नाही हे सांगितले आहे. उलट आतले ब्रह्म पाहिले की बाहेरचे कळून येईल, अशी युक्ती सांगितली आहे. पण असाही खुलासा केला आहे की, बाहेरच्या वस्तू पाहण्याचे सोडून द्यावयास नको, बाहेरच्या मोहात पडले नाही, म्हणजे पुरे.
बाहेरच्या मोहात तर पडायचे नाहीच, पण आतल्या मोहातही पडायचे नाही. देह हेआपल्याच आतल्या वस्तूचे बाहेरचे रूप. त्याच्याबद्दलचे खोटे प्रेम ज्ञानाने नाहिसे कराव, असे पहिली ओळ सांगते. दुसरी ओळ सांगते की देहाचे खोटे चोचले करण्याचे सोडले म्हणजे, भक्तीचा मार्ग सोपा होतो. तिसरी ओळ आश्र्वासन देते की, असे करताना विरक्तीचे जे बळ येईल, त्यामुळे निंदनीय असे असेल ते सर्व हळूहळू सोडून द्यावे आणि अशा मुक्त अवस्थेत, बाहेरचा मोह सोडून आपण सुखाने रहावे.

येथील ‘विरक्ती’ हा शब्द, भक्तीमुळे होणारा बदल सुचवितो. विरक्त म्हणजे विशेष रक्त असलेला. रसायनशास्त्रदृष्ट्या रक्ताचे चारच प्रकार आहेत; तरी स्वभाववैशिष्ट्यांच्या दृष्टीने आपण घराण्याच्या रक्ताची भाषा करीत असतो. वंश-रक्ताची भाषा बोलत असतो. तो एक संाकेतिक शब्द आहे. बदल सुचविणारा.

मनोबोधाचे ओवीरूप
पुढें गेला विदेशासी। प्राणी लागला व्यासंगासी।
आपल्या जिवेसी सोसी। नाना श्रम।।
ऐसा दुस्तर संसार। करितां कष्टला थोर।
पुढें दोनी च्यारी संवत्सर। द्रव्य मेळविलें।।
सवेंचि आला देशासी। तो आवर्षण पडिलें देसी।
तेणें गुणें मनुष्यांसी। बहुत कष्ट जाले।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView