शंकर

Date: 
रवि, 16 मार्च 2014

वैज्ञानिक अन्वय: ‘कृष्ण’मध्ये जी शक्ती वर्णन केली जवळ जवळ ती सर्व शक्ती ‘शंकर’या शब्दोच्चारात आहे. कृष्ण या उच्चारात क, र, ष, व, एक अनुनासिकवजा नाद ‘ण’याची शक्ती आहे. तर क, र, श, व ‘श’वरील अनुनासिकाचा नाद यांची शक्ती शंकर उच्चारात आली. कृष्णातील ‘ष’पोटफोड्या म्हणून अधिक तीव्र तसेच कृष्णातील अनुनासिकवजा नादशक्ती ‘ण’रूपाने अधिक स्पष्ट आहे. परिणामी ‘शंकर’मधील उच्चार शक्ती ‘कृष्ण’पेक्षा सौम्य आणि रौद्र याचे दोन टोकी मिश्रण भासते.

सांस्कृतिक अर्थ: दक्षिणेत याचा उच्चार ‘संकर’असा करतात. एका अर्थाने या दैवताने उपयुक्त संस्कृतिसंकर केला आहे. हिंदुधर्माला एकात्म करणारे हे दैवत आहे. द्राविड संस्कृती या दैवताला आपले प्रतीक मानत असल्याने व उत्तरेत याची भक्ती रूढ असल्याने आसेतु हिमाचल सांस्कृति एकतेची पार्श्वभूमी याला आहे.
उपयोग: व्रत सर्वच मंत्रांना आवश्यक, विशेषत: या देवतेला. आधुनिक कालानुसार एखादे लोकसेवाव्रत चांगले. व्रतासह शिवनाम हे हवे असल्यास पतिप्राप्ती देते. ‘ॐ नम: शिवाय’ मंत्राचा सुपरिणाम जीभ, टाळू, नासिका या भागावर होतो. तेथे नादुरूस्ती रोखली जाते. मेंदूची तरतरी कायम राखली जाते. एकूण शिवनाम शुध्दिकारक आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView