शिवाजी आणि मास्तर

Date: 
रवि, 4 जाने 2015

नव्हे वाऊगी चाहुटी काम पोटी।
क्रियेवीण वाचाळता ते चि मोठी।
मुखें बोलिल्यासारिखे चालताहे।
मना सद्गुरू तोचि शोधूनि पाहे।।182।।

या श्र्लोकाचा भावार्थ असा आहे की गुरू हा चाहुटी म्हणजे अचावचा बोलणारा नसावा. खोट्या इच्छा नसणारा, शुध्द कर्म करणारा गुरू असावा. नुसता शब्दााचा फापटपसारा माजवणारा गुरू चांगला नव्हे, तर बोलण्याप्रमाणे वागणारा गुरू निवडला पाहिजे.
आजच्यापैकी गुरूशिष्यंाच्या नात्याची अवहेलना सांगणारी एक मर्मग्राही कथा आहे. एका उनाड विद्यार्थ्याला शिक्षकाने म्हटले,

“तू चारदा नापास झालास. सतराव्या वर्षी अजून चौथीतच आहेस. शिवाजी तुझ्या वयाचा असताना त्याने तोरणा किल्ला घेतला होता. “ तो विद्यार्थी बिलंदर होता. तो शिक्षकांना उलटून म्हणाला, “मास्तर, तुमचे वय त्रेपन्न वर्षाचे आहे. तुमच्या वयात शिवाजीला राज्याभिषेक झाला आणि तुम्ही अजून मास्तरच आहात! “
उध्दटपणा हा गुण आहे असे सांगण्याचा हेतू नसून स्वत: काहीच न करता नुसतेच उपदेशाचे काढे शिष्याला पाजणारे गुरू कामाचे नाहीत, असा श्रीरामदसांचा प्रतिपादनाचा रोख आहे. तो लक्षात आणून द्यावयाचा आहे. ब्रह्मासारखे अत्युच्च सत्य शिकवण्यासाठी, जिज्ञासू नसलेला शिष्य चालणार नाही. तसाच खोटा गुरूही चालणार नाही. या उलट, गुरू कसा असावा याचा नमुना पुढील श्र्लोक सांगतो.

मनोबोधाचे ओवीरूप
संगती स्त्रीबाळकाची। आहे साठी जन्माची।
परी मायबापें कैची। मिळतील पुढें।।
ऐसें पूर्वी होतें ऐकिलें। परी ते समई नाही कळलें।
मन हें बुडोन गेलें। रतिसुखाचे डोहीं।
हे सखीं वाटतीं परी पिसुणें। मिळाली वैभवाकारणें।
रितें जातां लाजिरवाणे। अत्यंत वाटे।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView