श्रीराम

Date: 
रवि, 23 फेब्रु 2014

वैज्ञानिक अन्वय: ‘र’अक्षर सापेक्षत: लघुलहरी अधिक निर्माण करते. (तरंग लांबी कमी तेवढी वैज्ञानिक दृष्ट्या शक्ती अधिक) ‘आ’मध्ये दीर्घ लहरी व ‘म’ मध्ये मध्यम लहरी शक्ती, म्हणजेच, ‘र’च्या उच्चारात पुष्कळ शक्ती खर्च होते. ‘आ’ म्हणताना कमी. मुलांना ‘आ’ चा उच्चार सुलभ आणि ‘र’चा अवघड हा आपला अनुभव आहे. ‘राम’ मधील शक्ती या प्रकारे संतुलित आहे. त्याची सुरुवात शक्तितत्वाने झाली आहे. ‘र’चा उच्चार शक्तिप्रेरक मानला आहे. (वेबस्टर कोश, पृष्ठ 2378)
सांस्कृतिक अर्थ: “रमन्ते योगिनो यस्मिन्” किंवा “रमन्ते सर्वेषु भूतेषु” असे दोन्ही अन्वय अभिप्रेत धरतात. सत्य, निष्ठा, शौर्य याचे ‘राम’ हे प्रतीक आहे. ‘र’मध्ये अग्नितत्व आहे. राममहिमा, रामपूर्वातपीन्यपनिषद, कलीसंतरणोपनिषद, पद्मपुराण, इत्यादी अनेक पूर्वग्रंथात वर्णिला आहे. राम हा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र. त्याचे चरित बहुश्रुत आहे.
उपयोग: या किंवा कोणत्याही नामाचा उपयोग पोपटपंची करून होऊ शकणार नाही. त्या देवदेवतांचे गुण आचरणात आणीत, व्रताचरणाची जोड देत घ्यायचे आहे. चिंतन आणि वर्तन या दोन चाकांवर देवनामाचा ‘मंत्र’बनतो. या अर्थाने राममंत्राने बळ, पौरूष हवे असल्यास पत्नीसुख, संघटना कौशल्य, लोकप्रियता मिळू शकेल.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView