सज्जना’ची नवी व्याख्या

Date: 
रवि, 15 जून 2014

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञानें।
समाधान कांही नव्हे तानमानें।
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान तें सज्जनांचेनि योगं।।153।।

मागल्या श्र्लोकात आपण असे पाहिले की, ब्रह्म ही वस्तू काही शब्दात किंवा वर्तनात सापडणार नाही. त्या आधीच्या श्र्लोकात म्हटले होते की, ब्रह्मज्ञानाचा प्रवास सज्जनामुळे सुुकर होईल. तीच गोष्ट या श्र्लोकात निराळ्या संदर्भात पुन्हा सांगितली आहे.

द्भा श्र्लोकाच्या पहिल्या तीन ओळीत ब्रह्म हे कोणत्या मार्गांनी सापडू शकणार नाही, याची यादी दिली आहे. त्या यादीत सात मार्ग नाकारले आहेत. 1. पिंडज्ञान म्हणजे शरीरज्ञान, 2. तत्त्वज्ञान म्हणजे तात्विक ज्ञान, 3. तानमान म्हणजे गायनाने, 4. योगमार्ग, 5. याग म्हणजे यज्ञ, 6. भोग म्हणजे आनंदाचा उपभोग, 7. त्याग.
यापैकी तत्वज्ञान किंवा त्याग हे चांगले मार्ग असतानासुध्दा त्यांनी ब्रह्माची दिशा दाखवली जाणार नाही, याचे आश्र्चर्य वाटले. शेवटल्या ओळीत ब्रह्मापर्यंत जाण्याची खात्री ही सज्जनांमुळे निश्र्चित मिळे, असे का सांगितले आहे? थोडा विचार केला तर याचे रहस्य सहज कळेल.

तत्वज्ञान किंवा त्याग या गोष्टी चांगल्या आहेत हे खरे; पण नुसता त्याग किंवा नुसतेच तत्वज्ञान पुरेसे नाही. तत्वज्ञानात तात्विक ज्ञान होते, पण कृति होतेच असे नाही. उलट, त्यागामध्ये त्यागाची कृति होते. पण त्यामागे तत्वाची जाणीव असतेच असे नाही. पुष्कळदा त्याग हा नुसता दडपणाने, रुढीने आणि फलाशेनेही होतो. तेव्हा त्याग म्हणजे तत्वज्ञान आणि कृति यांचा संगम होतो. तेथे अधिक वरची पातळी गाठली जाते. असा संगम सज्जनांमध्ये होतो. ‘जनासाठी सत् करणारा तो सज्जन ‘अशी व्याख्या येथे अभिप्रेत आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
कन्या उपवरी जाल्या। पुत्रास नोवऱ्या आल्या।
आतंा उजवणा केल्या। पाहिजेत की।।
जरी मुलें तैसीच राहिली। तरी पुन्हा लोकलाज जाली।
म्हणती कासया व्याली। जन्मदरिद्रें।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView