सत्कृत्याचा चमत्कार

Date: 
रवि, 19 जाने 2014

पुण्याजवळ हडपसर म्हणून एक गाव आहे. त्या नजीक अपघात घडला. बाबूलाल नावाचा मोठा परोपकारी मनुष्य रस्त्यावर असताना ट्रकचा एक धक्का त्याला लागला. बरेच दिवस अंथरूणावर पडून बाबूलाल बरा झाला. पण त्याच्या डाव्या हातात थोडासा दोष राहिलाच. तो आजारातून उठल्यावर बाबूलालची बायको त्याला रागारागाने म्हणाली, “लोकांसाठी एवढी कामे करता. काय उपयोग आहे त्याचा? चांगले करून हात मोडल्याचेच फळ आहे ना? “
बाबूलाल शांतपणे बायकोला म्हणाला, “चमत्कार सत्कर्माचाच आहे. मी ट्रकखाली सापडल्यावर माझे दोन्ही हात तुटणार होते. पण गाडीचे डावे चाक दगडाच्या धक्क्याने एकाएकी वर चढले. माझा हातच तुटणार होता; पण पुण्य एवढे की डाव्या हाताच्या अधूपणावर निभावले. “

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView