सत्कृत्याचे वजन

Date: 
रवि, 2 फेब्रु 2014

हॅलेन्सिया या गावात फादर सीमॉन हा धर्मगुरू रहात होता. त्याच्याकडे एकदा एक गरजू बाई गेली. तिला पैसे हवे होते. अन्यथा तिच्या मुलीची अब्रू धोक्यात होती. संताजवळ पैसे नव्हते. त्याने एका चिठ्ठीवर एका व्यापाऱ्याला लिहिले, की ही बाई संकटात आहे. तिला या चिठ्ठीच्या वजनाइतके पैसे दे. व्यापाऱ्याने ती चिठ्ठी वजनाच्या एका पारड्यात टाकली. त्याला वाटले, एखाद्या छोट्या नाण्याने काम भागेल. पण संतांचे पुण्य मोठे असते. त्या बाईला जरूर तेवढी शंभर नाणी दुसऱ्या पारड्यात टाकल्यावरच वजन पुरे होऊ शकले. कृष्णाची तुलना भारंभार संपत्तीने झाली नाही पण तुळशीने झाली. या भारतीय कथेवरून आपल्याला पुरेशी स्फूर्ती मिळाली. सत्कृत्याचे वजन अमाप असते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView