सत्संगतीचे फळ

Date: 
रवि, 24 नोव्हें 2013

दधिची ऋषी म्हणजे महान त्यागी, तपस्वी. लोकांच्यासाठ त्याग करणे; त्यांचा आनंद असे. ते स्वर्गवासी झाल्यावर एकदा राक्षस फार माजले. आणि देवांना त्रास देऊ लागले. इंद्रही दधिचीचा शोध करू लागला. स्वर्गात जाण्यापूर्वी दधिचींनी घोड्याचे डोके स्वत:च्या धडावर बसवून, अश्र्विनीकुमाराला विद्या शिकविली, म्हणून इंद्राने दधिचीचे डोके उडविले होते. ते डोके देवांनी शोधून काढले. आणि ते डोके पाहिल्याबरोबर राक्षस पटापट मरू लागले. इंद्राने मारल्यावरसुध्दा पुण्यपावन झालेला ऋषींचा सत्कृत्यशील शरीरभाग, चांगल्या लोकांच्यासाठी एवढा झटत राहिला. दधिचींच्या पुण्यशील थोड्याशा सहवासानेसुध्दा, ते घोड्याचे डोळे पवित्र व समर्थ झाले होते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView