समाजवादी देव

Date: 
रवि, 7 डिसें 2014

जया मानला देव तो पूजिताहे।
परी देव शोधूनि कोण्ही न पाहे।
जगी पाहतां देव कोट्यानकोटी।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी।।178।।

समाजवादी हा शब्द सजाहितवादी या अर्थाने अध्यात्मामध्ये देवाला पूर्वीपासून लावलेला आहे. मागल्या श्र्लोकात पाहिल्याप्रमाणे प्रत्येक माणसात चांगली आणि वाईट प्रवृत्ती असते. इंद्राची ती दोन रूपे जेकील आणि हाईडची आठवण करून देतील. प्रत्येक माणसात इंद्र आहे. त्या इंद्रात दोन प्रवृत्ती आहेत. त्यापैकी चांगली प्रवृत्ती जोपासणे म्हणजे देव, अशी व्याख्या केली, म्हणजे देवाबद्दलचे भांडणच संपले.
प्रत्येक माणसाला देवरूप मानल्यानंतर देवाबद्दलचा आक्षेप उरतच नाही. “जे भेटे भूत, त्या मानी भगवंत” अशी संतांची सांगणूक आहे. पाप्यातला पापी माणूससुध्दा कृष्णरूप असू शकतो, असे गीता म्हणते. अकराव्या अध्यायात तर सुष्ट आणि दुष्टांना कृष्णाने सारखेच संहारले आहे. अध्यात्मामध्ये मृत्यू हा भयंकर मानलेला नसल्याने, शेवटी विवेक जागृतीकडे म्हणजे मनातल्या इंद्राच्या सुष्ट भागाला जागृत करण्याकडे माणसाचे प्रयत्न हवेत. हे म्हणणे मानसशास्त्राच्या दृष्टीनेसुध्दा संयुक्तिक आहे. अगदी सामान्यापर्यंत देवाची ही कल्पना संतांनी एवढी दृढ केली आहे की, तुकाराम महाराज म्हणतात, “देव मजूर, देव मजूर। नाही उजूर सेवेपुढे।’ उजूर म्हणजे सबब, याचा सरळ अर्थ असा आहे की देव कोणतीही सबब न सांगता मजुरासारखा राबत असतो.

तेव्हा देव शोधायाचा तर प्रत्येकाने आपापल्या वृत्तीप्रमाणष शोधला तरी त्यास तो सापडू शकेल. मात्र चांगल्या वृत्तीप्रमाणे ते करावे. श्रीरामदासांच्या पहिल्यरा दोन ओळीत तक्रार, असे न करण्याबद्दल आहे. हे मानले ते पुजायचे आणि खरा देव पहायचा नाही, यावर श्रीरामदासांचा आक्षेप आहे. म्हणून अखेरच्या ओळीत ते म्हणतात, जगात कोट्यानुकोटी देव आहेत. कारण आपल्याला जे मानवले तेवढ्याचीच म्हणजे आतल्या आतल्या गरजेची मनुष्य भक्ती करतो.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘परलोकसंपर्क मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9 श्र्लोक 14ची मंत्रसंलग्न ओवी लेखकच्या निवदेनातील तळटीपेप्रमाणे.)
तरी कीर्तनाचेनि नट नाचे। नशिले व्यवसाय प्रायश्र्चित्ताचे।
जे नामचि नाही पापचें। ऐसें केलें।।
अर्थ: भक्तांनी कीतर्नप्रसंगी भक्तीच्या भरात नाचून प्रायश्र्चित्ताचा व्यापार बंद पाडलेला असतो, कारण त्यांचे ठायी पापाचे नावही नसते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView