सुख कोणाला मिळते?

Date: 
रवि, 25 सप्टें 2011

सुख कोणाला मिळते?
जनी सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तूंचि शोधूनि पाहें।।
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले.ं।।1।।
इंजिनिअरला वाटत असते की, आपला धंदा भारी कटकटीचा. उन्हातान्हात हिंडायचे, माळराना, अघोरी जंगलात, नद्या पुलांवर कष्टत राहायचे, यापेक्षा डॉक्टर बरा. उलट डॉक्टर म्हणत असतो की, मी कसला? नको माझा धंदा, कडू आणि घाण वासंाच्यामध्ये बसलेला ओ. रोगी केव्हा बोलवायला येईल याचा नेम नाही. जेवताना घास टाकून उठावे लागते. यापेक्षा वकील बरा. कामाच्या वेळा ठरलेल्या. कोर्ट संपले की मोकळा! मग वकील कुरकुरतो, “कसला हा धंदा? रोज उीून प्रत्येक कोर्टात न्यायाधिशांपुढे लाचारीने बोलणे आणि मन सांभाळणे. ही तारेवरची कसरत आणि खुषमस्करेगिरी. जय मिळाला तर अशील म्हणते, ‘माझी केस खरी होती म्हणून जय मिळाला. ‘ केस हरली, तर शिव्याशाप तेवढे माझ्या वाट्याला. यापेक्षा व्यापारात शिरलो असतो तर बरे झाले असते. “
व्यापाऱ्याकडे वळावे, तर तिकडे त्याची गाऱ्हाणी असतातच. व्यापाऱ्याना आणि श्रीमंताना दु:खष फार म्हणून आज “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे” अहवाल सांगतात. गीतेपासून ‘सरमन ऑन दी माऊंट’ पर्यंत सर्व धर्मस्थळे तेच ओरडून राहिली आहेत.
मग जगात सुखी आहे तरी कोण?विचार केलाच तर कोणीच सुखी नाही, आणि तीच गोष्ट रामदास पहिल्या दोन ओळीत बजावीत आहेत. सुखी या जगात कोणीच नाही. आणि जे काही दु:ख आहे, तो आपल्या पूर्वीच्या कर्माचा वारसा आहे. ही गोष्ट “इफेक्ट इज मेजर्ड बाय द कॉज” या वैज्ञानिक व्याखेने सिध्द होईल आणि प्रत्येक प्रमुख धर्म-कर्म नियम मानतोच.
मनाचे अभंगरूप
फजितखोर मना किती तुज सांगो। नको कोणा लागो मागे मागे।।1।। ।।धृ।।
स्नेवादे दु:ख जडलेंसे अंगी। निष्ठुर हे जगी प्रेमसुख।।2।।
निंदास्तुती कोणी करो दयामाया। न धरी चाड या सुखदु:खे।।3।।
योगिराज कां रे राहाती बैसोनि। एकिये आसनी याचि गुणें।।4।।
तुका म्हणे मना पाहें विचारून। होई कठिण वज्राऐसें।।5।।
- तुकाराम

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView