हजार तोंडी नागाचे मौन

Date: 
रवि, 20 जुलै 2014

श्रुति न्याय मीमांसके तर्कशास्त्रें।
स्मृती वेद वेदांतवाक्यें विचित्रें।
स्वयें शेष मौनावला स्थीर पाहे।
मना सर्व जाणीव सांडून राहे।।158।।

गेल्या श्र्लोकामध्ये अनेक शास्त्रांत मत-मतांतरे आहेत, असा नुसता उल्लेख आहे. या श्र्लोकात या सगळ्या शास्त्रांची यादीच दिली आहे. श्रृति, न्यायशास्त्र, मीमांसा, तर्कशास्त्र, वेद, वेदांत अशा भिन्न ठिकाणी ज्ञानाची विविध चित्रे दिसतात.
आता येथे श्रीरामदासांना ही चित्रे विविध दिसत असली तरी खशेटी आहेत, असे म्हणावयाचे नाही. मागल्या श्र्लोकाच्या अनुषंगाने सांगितलेल्या सरड्याच्या गोष्टीप्रमाणे, वरच्या दृश्यात विचित्रता असली तरी आतले सत्य एकच आहे.

याबद्दल अभ्यासकांनी, अनेक मुख्यांनी व्यर्थ भांडणे केली आहेत. त्यांना एकच फटकारा देऊन श्रीरामदास तिसऱ्या ओळीत म्हणत आहेत की, तिकडे पृथ्वीवर तुम्ही अनेक मुखांनी भांडत आहात, पण पृथ्वीचा भार सहन करीत असलेला जो शेष नाग, तो अनेक मुखे स्वत:ला असूनही मौन धरून बसला आहे.

चौथी ओळ सांगते की, सत्य जाणावयाचे असेल तर नुसत्या शब्दांचा उपयोग नाही, तर त्या अभ्याच्या अहंकारापलीकडे मनाने गेले पाहिजे. तोंडाचा उपयोग ज्ञान वाढवावयास माणसाने करावा. पण तसा करूनच माणूस थांबत नाही; तर अर्धवट ज्ञान घेतल्यावर तो ज्ञानाच्या अहंकारात सापडतो. त्यामानाने नागाची खूण अगदी उलटी आहे. हजार तोंडे असेलेला शेष कितीतरी शब्द निर्माण करू शकेल पण एकदा जाणीव झशल्यावर, म्हणजे ज्ञान झाल्यावर त्याचे तोंड गप्प आहे. आणि कृती बोलकी आहे. आणि ती कृती म्हणजे सगळ्या पृथ्वीला सावरण्याच्या सत्कृत्यांनी, सज्जनपणाची. त्याचे मर्म एकशे चौसष्टाव्या श्र्लोकानंतर अधिक स्पष्ट केले.

मनोबोधाचे ओवीरूप
कांही मेळविलें विदेशी। जीव लागला मनुष्यांपासीं।
मग पुसोनियां स्वामीसी। मुरडता जाला।
तव तें अत्यंत पीडावली। वाट पाहात बैसली।
म्हणती दिवसगती का लागली। काय करणें देवा।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView