‘गाढवा’सारखा प्रश्र्न

Date: 
शनि, 15 डिसें 2012

धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें।
नरा दुस्तरा त्या परा सागरातें।
सरा वीसरा त्या भरा दुर्भरातेंे।
करा नीकरा त्या खरा मत्सरातें।।80।।

शब्दांच्या अलंकार अनुप्रासावर पोसलेला हा एक सुंदर श्लोक आहे. “राममार्ग धरा” असे सांगताना पहिल्या ओळीत “हरा अंतराते” असा उपदेश आहे. “हरा अंतराते” चे दोन अर्थ दिसतात. पहिला अर्थ “श्रीशिवाय अंतरात आहे तो’आणि दुसरा अर्थ हरा म्हणजे ‘नाहिसे करा’कशाला? तर अंतरातील चिंतेला. तिसरा अर्थ असाही होऊ शकेल की, ‘राम आणि तुम्ही यांच्यामध्यले अंतरच नाहिसे करा. ‘
हे अंतर नाहिसे केले म्हणजे दुसरी ओळ सांगते की त्यामुळे संसाराचा हा परम विशाला दुस्तर सागर तुम्ही तरून जाल.
चौथ्या ओळीत म्हटले आहे की, ‘खरा’सारखा मत्सर म्हणजे गाढवासारखा मत्सर करू नका. तिसऱ्या ओळीचा आणि या उपदेशाचा संबंध काय असावा?सोपी गोष्ट आहे. पोट भरण्यासाठी मनुष्य कष्ट करतो. पण त्याचे नुसते पोट भरून समाधान होत नाही. तर पोट भरण्यासाठी त्याला रुचकर पदार्थ लागतात. ते पदार्थ जर त्याला मिळाले नाहीत, तर ज्या भाग्यवान माणसाला ते मिळाले असे त्याला वाटते, त्या माणसाचा साहजिकच त्याला मत्सर वाटतो. आता गमतीचा प्रश्र्न असा की गाढवाला आपल्या शेजाऱ्याचे खाद्यवैभवाबद्दल मत्सर वाटतो काय? पण हा प्रश्र्नच गाढवपणाचा आहे, असे नीट विचार केला तर कळेल. गाढवपणा याचा अर्थ येथे निर्बुध्दपण किंवा विचार न करता केलेला प्रश्र्न एवढाच घ्यावा लागेल. मनोबोधाचे ओवीरूप
तये संकोचित पंथी। बळेची वोढून काढिती।
तेणें गुणें प्राण जाती। बाळकाचे।।
बाळकाचे जाता प्राण। अंती होये विस्मरण।
तेणे पूर्वील स्मरण। विसरोन गेला।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView