‘मत्सर व अहंकार’मुक्त कसे व्हाल?

Date: 
रवि, 1 जुलै 2012

मदें मछरें सांडिली स्वार्थबुध्दी।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी।
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।51।।

गीतेच्या बाराव्या अध्यायात भक्ताची लक्षणे दिली आहेत. खरा भक्त कसा असतो, याची सर्व लक्षणे बाराव्या श्लोकापर्यंत आपल्याला दिसतील. त्यातली काही प्रमुख, एकावन्नाव्या मनाच्या श्लोकामध्ये आली आहेत.

अहंकार आणि मत्सर ही दोन्ही टोके जिच्यामध्ये आढळत नाहीत, अशी व्यक्त भक्त होऊ शकते. आपल्यापेक्षा छोट्या माणसाच्या तुलनेत माणसाला जी भावना वाटते, तिचे नाव ‘अहंकार’ आणि उलट आपल्यापेक्षा भाग्यवान माणसाबद्दल जी भावना वाटते, तिचे नाव ‘मत्सर’. पण खऱ्या भक्ताला या दोन्हींची बाधा नसते. कारण तो स्वत:पेक्षा छोटा कोणाला समजत नाही आणि उलट देवापेक्षा मोठा कोणाला मानत नाही. तेव्हा येथे मत्सराचे मूळच तुटते. त्याच कारणामुळे त्याला स्वत:बद्दल छोटी हितबुध्दी गंाजत नाही. साहजिकच प्रपंचातली अनेक दु:खे व उपाधी त्याच्या वाटेला कोठून जाणार? लहान मोठेपणाचा बाध संपला, खोटा अहंकार संपला, म्हणजे बोलण्यातही नम्रता व सरळपणा येतो. दासबोधात रामदासांनी म्हटले आहे. ‘ज्यांनी समार दिसणाऱ्या दृश्याचे नीट विश्र्लेषण केले, त्यांची प्रपंचबुध्दी उरत नाही आणि असा पवित्र भक्त देवाला आवडणार, तसाच भक्तही सर्वांना देवरूप मानणार, यात शंका नाही.’

मानस ज्ञानेश्र्वर
(‘मृत्यु शोक मुक्ती’ मंत्र या साधनेसाठी, अध्याय8श्लो.6ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
एऱ्हवी तरी साधारण। उरी आदळलिया मरण।
जो आठव धरी अंत:करण। तेचि होईजे।।69।।

अर्थ: सामान्यत: असा नियम आहे की, मृत्युवेळ आली असता जीव अंत:करणात जे आठवतो तेच तो होतो.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView