‘संकटे ‘हाच दु:खहारक मंत्र

Date: 
रवि, 31 मे 2015

मना सर्वही संग सोडूनि द्यावा।
अती आदरें सज्जनाचा धरावा।
जयाचेनि संगे महादु:ख भंगे।
जनीं साधनेंवीण सन्मान लागे।।203।।

हा श्र्लोक मनाला उपदेश करतो. हे मना, तू इतर प्रकारच्या सहवासांचा लोभ सोडून दे. पण सज्जनांच्या संगतीमुळे दु:खाचा निचरा होतो आणि मग निराळ्या साधनेची गरज न पडता सन्मार्ग लाभतो.
केवळ सत्च्या, केवळ परोपकाराच्या संगतीने महादु:ख जाते, असे या श्र्लोकाचे आश्र्वासन आहे. पण सगळ्या भक्तांची आणि खुद्द देवांची चरित्रे पाहिली, तरी त्यांचेवर संकटाच्या राशी कोसळल्या. दोनशेव्या श्र्लोक विवेचनात श्रीरामदसांच्या अकराव्या वर्षी मारहाण झाल्याची हकीगत आहे. “श्रीरामदास वाङ्मय आणि कार्य “ या ग्रंथाचे लेखक प्रा.न.र.फाटक पान तीनवर म्हणतात, “ज्यावर कृपा करावयाची, त्याला धरून मारहाण करीत फरफटत ओढीत न्यायचे कारण काय होते? “ तू नाही तर तुझा बाप याच्या उलट ‘बाप नाही तर तूच ‘ या न्यायाने नारायणावर त्यावेळी विपरीत सुलतानी प्रसंग गुदरला. या योगाने बापास मृत्यू आला व भावाला वंशपरंपरागत कामगिरी सोडून द्यावी लागली. नारायण स्वत:वर ओढवलेल्या प्रसंगाचे परिणाम वर्षभर स्तब्धपणे पहात होता. शेवटी त्याने देवाच्या उपासनेसाठी ‘जीवलगांच्या तुटी ‘ स्वीकारून घर सोडले असा अर्थ या कथेचा विचार केल्यास ध्यानी उतरतो. “

श्रीरामदासांच्या पुढल्या आयुष्यातही अनेक संकटे त्यांच्यावर कोसळली. देवाच्या कृपेची खूण तात्काळ यश ही नसून तात्काळ संकटे हीच आहे, असे सर्व इतिहास सांगतो. अशुध्द हेतू एक वेळ तात्काळ व अल्पकाळी यश मिळवून देईल, पण शुध्द हेतूला संकटे आलीच पाहिजेत असा इतिहास आहे. त्याने महादु:ख जाईल. याचा अनुभव या श्र्लोकात आहे. आणि काही संदर्भ पुढील श्र्लोकात आहेत.

मनोबोधाचे ओवीरूप
तंव तिची वार्ता आली। तुमची कांता भ्रष्टली।
ऐकोनिया अंाग घाली। पृथ्वीवरी।।
सव्य अपसव्य लोळे। जळें पाझरती डोळे।
आठवितां चित्त पोळे। दु:खानळें।।
द्रव्य होतें मेळविले। तेंही लग्नास वेचलें।
कांतेसही धरून केले। दुराचारी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView