“आई गं!!” ....

Date: 
रवि, 22 जाने 2012

उद्‌गाराचे विज्ञान
दिनानथ हा राम कोदंडधारी।
पुढें देखता काळ पोटीं थरारी।।
मना वाक्य नेमस्त हें सत्य मानी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।28।।

मागल्या श्लोकात मरणाच्या भीतीपासून राम कसा निर्भय करू शकेल, हे सांगितले. त्याचा धागा या श्लोकाच्या ‘दिनानाथ’ या शब्दाने जोडून घेतला आहे. मरणाच्या भीतीने दीन झालेले जे लोक असतात, त्यातले जे लोक रामापुढेही दीन होण्याचा बदल स्वत:च घडवून आणतात, त्यांना रामस्मरण मरण-भयापासून सोडवते. राम या धनुष्यधारी प्रकृतीची ‘कोदंडधारी’ या शब्दाने आठवण करून दिली आहे. त्यात वास्तविक निर्भय राहण्याचा संदेश आहे.
धनुष्यधारी रामाची भक्त पूजा करतो. रामाच्या त्या आकृतीमध्ये धनुष्य धरलेले असते. पण प्रत्यक्ष आयुष्यात राम काही चोवीस तास धनुष्याला बाण लावून उभा नसे. तो सारे इतर व्यवहार करताना धनुष्यबाण बाजूला ठेवूनच करीत असला पाहिजे. पण मर्मप्रतीक किंवा आदर्श म्हणून त्याची शौर्यशाली आकृती असल्याने मनुष्य अधिक निर्भय राहतो. की एकेक संस्कारांची गोष्ट असते.
लहानपणी ज्यावेळी भीती असेल, तेव्हा मूल आईकडे पळते.तेथे त्याला आसरा मिळतो. कोणत्याही भयापासून आई सोडवील, असा त्याला विश्वास निर्माण होतो. मग त्याची आई जिवंत नसली, तरी मोठेपणी दु:ख आल्यावर हा मनुष्य ‘आई गं, आई गं’ म्हणून कण्हत बसतो. मानसिक थरावर याचे दु:ख या युक्तीने कमी होत असले पाहिजे, हा एक नकळत मिळणारा पुरावा आहे. म्हणून ज्यांनी संकटे धैर्याने सोसली, त्यांचे प्रतीक आपल्या बुध्दीशी एक केले तर आपल्यात संकटे सोसण्याचे सामर्थ्य येईल.
हे सर्व अनुभवसिध्द मन:सामर्थ्य आहे आणि ते मृत्युभयासही लागू आहे. म्हणून श्रीरामदास सांगत आहेत की, ‘हे शौर्यप्रतीक मृत्युभयातही तुला धीर देईल. ‘ ज्या लोकांनी हे शौर्यप्रतीक जवळ केले त्यांना निर्भयतेचा नेमस्त निरपवाद अनुभव आहे. कारण रामचैतन्यालासुध्दा आपल्यावर विश्वासणाऱ्या भक्तांचा अभिमान आहेच.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView