“जड, मन, आत्मा” यांच्या व्याख्या

Date: 
रवि, 5 एप्रिल 2015

वसे हृदयी देत तो जाण ऐसा।
नभाचे परी व्यापकू जाण तैसा।
सदा संचला येत ना जात काही।
तयावीण कोठें रिता ठाव नाही।।195।।

देव हा हृदयात भरलेला आहे. तसाच तो आकाशाएवढा व्यापक आहे. त्याचा संचार सर्वत्र आहे. त्यामुळे त्याचे येणे जाणे नाही.

आणि तो नाही अशी कोठे पोकळ जागाही नाही. हा सर्व या श्र्लोकाच्या चार ओळींचा सारंाश आहे. तो समजून घेण्यासाठी गेल्या श्र्लोकात म्हटल्याप्रमाणे जड देह, मन आणि आत्मा यांच्या व्याख्या पाहू.
जडामध्ये तौलनिक स्थितीस्थापकत्व आहे. म्हणजे ते स्वत:च्या इच्छेने ढळत नाही. (मेंदू किंवा मनुष्यनिर्मिती रॉबॉटला स्वत:ची प्रतिभा कधीही असू शकणार नाही असे पान 203, ‘सायबर्नेटिक विदीन अस’ या पुस्तकात लिहिले आहे. (संदर्भ 36 टी) - मन हे तौलनिक दृष्टीने सतत ढळलेलेच असते; पण त्याला जडाचे आकर्षण असल्याने त्याची गती मर्यादित होते. आत्मा हा जडात गुंतलेला नसतो. त्यामुळे त्याची गती एका बाजूने अप्रतिम, अफाट आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याला इच्छा नसल्याने तो खराखुरा शांत आहे.
सोप्या भाषेत उपमा द्यायची तर एखाद्या झोपडीतला माणूस महालाची इच्छा करतो, मनाने तो महालात उडी घेतो. (जी गोष्ट महालातील तीच स्वर्ग-नरकातील); पण त्याचा आत्मा त्या मनाबरोबर महालातही जातो आणि शरीराबरोबर झोपडीतही असतो.

त्या आत्म्याला महालाचे प्रेम नसते किंवा झोपडीची घृणा नसते. वस्तुत: मन आणि आत्मा या अलग गोष्टी नाहीत ही गोष्ट लक्षात घेतल्यावर हे कोडे सुटेल. चंचल मनातली चंचलता संपवली की ‘आत्मा’रूप उरते.
अशुध्द मनात शुध्द आत्मा कसा राहतो अशी शंका येईल. त्यावर उपमा ढोबख आहे. माती असलेला अशुध्द पाण्याचा पेला स्थिर ठेवला म्हणजे माती खाली बसते आणि शुध्द पाणी वर राहते.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘धान्यसमृध्दी’मंत्र या साधनेसाठी अध्याय 9 श्र्लोक 19ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवदेनातील तळटीपेप्रमाणे.)
मी सूर्याचेनि वेषें। तपें तै हें शोषे।
पाठी इंद्र होऊनि वर्षे। तै पुढती भरे।।296।।
अर्थ: सूर्यरूपाने मी ताप उत्पन्न करतो, तेव्हा हे जल आटते. नंतर मीच इंद्ररूपाने वर्षाव करतो, तेव्हा ते पुन्हा भरते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView