आठवड्याचा श्लोक

Syndicate content

शेवटला महामंत्र

मनाची शतें ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधना योग्य होती।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंागी।
म्हणे दास विश्र्वासता मुक्ति भोगी।।205।।

या अखेरच्या श्र्लोकामध्ये मनाचे श्र्लोक ऐकल्यामुळे काय फळ मिळते, ते सांगितले आहे. ती फळे चढत्या प्रमाणात चार प्रकारची आहेत. एक, दोष जातात. दोन, मूर्ख मनुष्यसुध्दा साधनेला पात्र होतो. तीन, ज्ञानवैराग्याचे सामर्थ्य येते. चार, विश्र्वास ठेवला तर मुक्तीचे, स्वातंत्र्याचे सुख मिळेल.
यापेक्षा माणसाला काय हवे असते? दोष निघून जावेत, योग्य साधना हातून व्हावी, सामर्थ्य अंगी यावे आणि आपण स्वतंत्र व्हावे, यापेक्षा आयुष्याची सफलता तरी कोणत्या? त्या सफलतेसाठी श्रीरामदास स्वामींनी मनाचे हे महामंत्र रचले आहेत. मनाला त्राण देतो, तो मंत्र. मनाची एक विशिष्ट स्थिती निर्माण करतो, तो मंत्र. मनाच्या श्र्लोकातील बहुतेक श्र्लोक मनाची विशिष्ट स्थिती निर्माण करतात. कधी हे श्र्लोक दोषावर बोय ठेवतात. कधी गुणाला चुचकारतात. कधी चांगले काय ते हाती देतात. कधी वाईट काय ते टाळायला सांगतात. निराशेचे क्षण पालटावे कसे? यशाच्या वेळी संयम कसा बाळगावा? यश कसे पचवावे? मनाला शिस्त कशी लावावी? त्यातनू निश्र्चय कसा करावा? आत्मविश्र्वास कसा धरावा?हे सगळे समजण्यासाठी वेगवेगळ्या स्थितीत मन नेणे आवश्यक असते. आणि ते या मनाच्या श्र्लोकात नेले गेले आहे.

मानसशास्त्रामध्ये, अगी प्रगत संशोधनात जे निष्कर्ष निघतात, त्याच्या आधारावरच ही अपूर्व रचना जणू काही सिध्द झालेली दिसते. कोणतेही सुख मिळण्याचे आणि दु:ख कमी होण्यांचे सामर्थ्य या मनाच्या श्र्लोकात आहे. त्यातले सामर्थ्य जाणण्यापुरते जरी आपण कमी न पडलो, तरी आपले कल्याण झाल्यावाचून राहणार नाही. यावर अनेक तऱ्हेचे संशोधन चालू आहे. निष्कर्ष अतिशय सामर्थ्यप्रेरक आहेत. जिज्ञासून अभ्यासकांच्या वतीने, श्रीरामदासांना परम आदराने वंदन!

मनोबोधाचे ओवीरूप
देह अत्यंत खंगला। सर्वांग वाळोन गेलें।
वातपीत उसळले। कंठ दाटला कफें।।
वळे जिव्हेची बोबडी। कफें दाटला घडघडी।
दुर्गंधी सुटली तोंडी। नाकी स्लष्मा वाहे।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView