आठवड्याचा श्लोक

Syndicate content

रामनामाचे वैज्ञानिक सामर्थ्य

कदा वोळखीमाजि दूजें दिसेना।
मनीं मानसी द्वैत कांही वसेना।
बहुतां दिसां आपुली भेटी जाली।
विदेहीपणें सर्व काया निवाली।।201।।

मागल्या श्र्लोकात महाप्रतापी रामदर्शनाचा प्रसंग आहे. त्याच अवस्थेत हाही श्र्लोक दिसतो. हा श्र्लोक म्हणतो, एकदा ही ओळख मनात ठसल्यानंतर मनात दुसरे काही येतच नाही. अनंत काळाने ही भेट झाली, त्यामुळे देहबुध्दी नाहिशी झाली, आणि शांत वाटले.
श्र्लोकाचा हा भावार्थ झाला. श्रीरामदासांना हा अनुभव आला तसाच इतर अनेक भक्तांना आला. यशशांती या मंत्रग्रंथात देवातील नावाचा अर्थ कसा करावयाचा, या दृष्टीने विवेचन आहे. त्या दृष्टीने रामनामातील वैज्ञानिक शक्तीही पाहण्याजोगी आहे.
वैज्ञानिक अन्वय: ‘र ‘हे अक्षर सापेक्षत: अधिक लघुलहरी उत्पन्न करते. (तरंग लांबी कमी तेवढी वैज्ञानिक दृष्ट्या शक्ती अधिक) ‘आ ‘मध्ये दीर्घ लहरी व ‘म’ मध्ये मध्यम लहरी शक्ती, म्हणजे ‘र ‘च्या उच्चारात पुष्कळ शक्ती खर्च होते, ‘आ ‘म्हणताना कमी. मुलांना ‘आ ‘उच्चार सुलभ आणि ‘र ‘ चा अवघड, असा आपला अनुभव आहे. ‘राम ‘मधील शक्ती याप्रकारे संतुलित आहे. त्याची सुरुवात शक्तीतत्वाने झाली आहे. ‘र ‘चा उच्चार शक्तीप्रेरक मानला गेला आहे. (वेबस्टर कोश, 2378)

सांस्कृतिक अर्थ: “रमन्ते योगिनो यस्मिन् “ किंवा “रमन्ते सर्वेषु भूतेषु “ असे दोन्ही अन्वय अभिप्रेत धरतात. सत्य, निष्ठा, शौर्य याचे ‘राम ‘हे प्रतीक आहे. ‘र ‘मध्ये अग्नितत्व आहे. राममहिमा रामपूर्वीतपीन्युपनिषद, कलीसंतरणोपनिषद, पद्मपुराण इत्यादी अनेक पूर्वग्रंथात वर्णिला आहे. राम हा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र, त्याचे चरित्र बुहश्रुत आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
बापास वेगळें घातलें। कोंपट बांधोन दिधलें।
मन कांतेचें लागलें। स्वार्थबुध्दी।।
कांता तरुण पुरुष वृध्द। दोघांस पडिला संमंध।
खेद सांडून आनंद। मानिला तेही।
स्त्री सांपडली सुंदर। गुणवंत आणि चतुर।
म्हणे माझें भाग्य थोर। वृध्दपणी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView