शिक्षण परिषद २०१७

Manashakti Shikshan Parishad_3
Manashakti Shikshan Parishad_2
Manashakti Shikshan Parishad_1
Manashakti Shikshan Parishad_4

२१ व्या शतकातील नव्या पिढीच्या चारित्र्य संवर्धनाचा सर्वांगीण विचार
मनशक्ती प्रयोगकेंद्र, भावी पिढी कर्तबगार व कृतज्ञ निर्माण व्हावी, यासाठी पू. स्वामी विज्ञानानंद यांच्या प्रयोगांवर आधारित शैक्षणिक कार्य करीत आहेच. त्याचा पुढील टप्पा म्हणून ही शिक्षण परिषद दि. २० ते २२ जानेवारी २०१७ या काळात आयोजित केली आहे. आपण या परिषदेत सहभाग घेऊन आपला सकारात्मक प्रतिसाद द्याल हा विश्वास. २१व्या शतकातील नव्या पिढीच्या चारीत्र्य संवर्धनाचा सर्वांगीण विचार हा बीजविषय प्रस्तुत शिक्षण परिषदेसाठी निवडला आहे. यातील चर्चासत्रात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर विचारवंत सहभागी होणार आहेत.

सुसंस्कृत, संवेदनशील व उत्तरदायी मानव निर्माण करणे हे शिक्षणाचे महत्वाचे ध्येय आहे. चारित्र्य संवर्धन हे शिक्षणाचे सार आहे आणि शिक्षक हे शिक्षण-संस्कार प्रक्रियेचे अग्रदूत आहेत. हल्लीचे शिक्षण जागतिकीकरणाच्या संक्रमण अवस्थेतून जात असताना आणि संपूर्ण जगात संकल्पनांची पुनर्मांडणी होत असताना मुलभूत शैक्षणिक विचारांची देवाण घेवाण होणे आवश्यक आहे. शिक्षणाचा नेमका हेतू काय असावा? शिक्षणात पालक, शिक्षक, समाजाची भूमिका कोणती असावी? मूल्याधारित, उपयुक्त आणि सर्वांगीण विकास घडवणारे शिक्षण कसे देता येईल? मूल्यसंवर्धनाबाबत शिक्षकांकडून असणार्‍या अपेक्षा व त्यांच्यासमोरील आव्हाने कोणती? असे विषय घेऊन मनशक्ती प्रयोगकेंद्र दि. २० ते २२ जानेवारी २०१७ या काळात ३ दिवसीय शिक्षण परिषदेचे आयोजन करीत आहे. २१व्या शतकातील नव्या पिढीच्या चारीत्र्य संवर्धनाचा सर्वांगीण विचार हा बीजविषय प्रस्तुत शिक्षण परिषदेसाठी निवडला आहे. यातील चर्चासत्रात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर विचारवंत सहभागी होणार आहेत.

या परिषदेत आपण आणि आपल्या संस्थेतील प्रयोगशील शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे या चर्चासत्रांतील विचारमंथनातून निर्माण होणार्‍या उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्याला आपल्या संस्थापातळीवर करता येईल.

कृपया सहभागासाठी सोबतची माहिती पूर्ण वाचावी व फॉर्म भरून त्वरित पाठवावा. अंतिम मुदत दि. १० डिसें. २०१६. निवड समिती मार्फत त्यानुसार प्रवेश निश्‍चिती कळवली जाईल.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView