वैद्यकीय तपासणी शिबिर

मनशक्ती केंद्राच्या हेल्थ न्यू वे ट्रस्टतर्फे, आरोग्य सेवा उपक्रमांतर्गत, पुढील व्यक्तींना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधे दिली जातात -
* गरीब, गरजू मुलेमुली
* आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी
* दुर्गम व ग्रामीण भागातील मुलेमुली व बंधुभगिनी
* ग्रामीण भागातील प्रौढ व वृद्ध बंधू-भगिनी
* लोणावळ्याजवळून पायी चालत जाणारे दिंडीचे वारकरी इ.

मुख्यत: मावळ परिसरात व काही प्रमाणात महाराष्ट्रातील इतर गावांमध्ये, मागणीनुसार हा मेडिकल कँप घेतला जातो. त्यामध्ये ऍलॉपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अशा विविध पॅथीज्च्या डॉक्टरांकडून, विनामूल्य आरोग्य सेवा दिली जाते. मनशक्ती दिवाळी अंकात, दरवर्षीच्या आरोग्य सेवा उपक्रमांचा अहवाल (१ एप्रिल ते ३१ मार्च) प्रसिद्ध केला जातो.

‘पल्स पोलिओ’ या राष्ट्रीय उपक्रमात, उपक्रमाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष दिवशी, पोलिओची लस, लोणावळा नगरपरिषद, लोणावळा परिसर व अति दुर्गम खेडेगावात पोचविण्यासाठी विनामूल्य वाहन व्यवस्था मनशक्ती केंद्रातर्फे केली जाते. प्रत्यक्ष लस (पल्स पोलिओ ड्रॉप्स) देण्यासाठीही, मनशक्तीचे योजनेतील विद्यार्थी व डॉक्टर विविध ठिकाणी उपस्थित असतात व सुपरव्हिजनही करतात.

याव्यतिरिक्त, काही प्रासंगिक रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातात.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView