न्यूरो कॉग्निटिव्ह टेस्ट

Rs.1,875.00

चाचणीचे नांव: मेंदू क्षमता व जाणीवांचे मापन
वयोगट: ८ ते ८० वर्षे
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. १८७५/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२० / १ / २

मानवी मेंदूच्या क्षमता (न्यूरो) आणि जाणिवा यांचे मापन करणार्या चाचण्यांचा समूह, म्हणजे न्यूरोकॉग्नेटिव्ह टेस्ट्स. या चाचणी समूहामध्ये एकूण सात प्रकारच्या क्षमतांचे मापन होते. मानस शास्त्रावर आधारित असणार्या या चाचण्यांची माहिती पुढे दिली आहे. सर्व चाचण्या झाल्यावर त्याचा अहवाल (रिपोर्ट) तयार होतो. या आधारे ज्यामध्ये क्षमता कमी आहे. ती वाढवण्यासाठीचे उपाय मार्गदर्शनही (काऊन्सिलींग) केले जाते.

मेंदू क्षमता व जाणिवांचे क्षेत्र:

 • स्मृती (Memory)
 • क्लिष्ट अवधान (Complex Attention)
 • प्रतिक्रिया वेळ. (Reaction Time)
 • प्रक्रिया पूर्णत्त्व कालावधी (Processing Speed)
 • मानस प्रक्रीया पूर्णत्त्व कालावधी (Psychomotor Speed)
 • जाणिवांची लवचिकता (Cognitive Flexibility)
 • कार्यकारी क्षमता (Executive Function)
 • १. शब्द स्मृती चाचणी (व्हर्बल मेमरी)
  २. दृश्य स्मृती चाचणी (व्हिज्युअल मेमरी)
  ३. बोट आपटण्याची चाचणी (फिंगर टॅपिंग)
  ४. चिन्ह - अंक संकेतीकरण चाचणी (सिंबॉल डिजिट कोडिंग)
  ५. रंग चाचणी (स्ट्रूप)
  ६. बदलत्या अवधानाची चाचणी (शिफ्टिंग अटेंशन)
  ७. अखंड कार्य चाचणी (कंटिन्युअस परफ़ोर्मन्स)

  मेंदू क्षमता व जाणिवांच्या या एकूण ७ चाचण्याचा समूह आहे.

  1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

  View Catelogue.jpgView