Weekly Story

Syndicate content

संकेत चिन्हातही

पुरावा क्रमांक 47: संकेत चिन्हातही
घारापुरी लेण्यातील त्रिमूर्ती अनेकांनी राष्ट्रीय सास्कृतिक-कार्यक्रमातही पाहिल्या असतील. त्रिमूर्ती कल्पनेत ओम आहे, हे नंतर आपण पाहणार आहोते. आजच्या राजमुद्रवरही त्रिमूर्ती प्रतीक आहे. ख्रिस्ती धर्मात ख्रिस्त, घोस्ट आणि देव या त्रिमूर्ती पलीकडील एकता वर्णन केली आहे. तीन संकेतातून एक पूर्णता निर्माण करण्याची ओमची ही प्रतीकयुक्ती, ठिकठिकाणी दिसेल. साधे चार कोयते किंवा विळे एकत्र केले तरी त्यातून ओम निघेल. म्हणजे शेतकरी, कामगार, सामर्थ्य वैभवशाली व्यक्ती आणि शक्ती.

या सर्व क्षेत्रात कळत न कळत ओंकार लहरत आहे. ‘योगायोग ‘पध्दतीतील पुरावे आपण पुरावा क्र.27पासून पाहात आहोत. ते येथे संपले. येथून पुढे प्रत्यक्ष जीवनातील काही उदाहरणे आपण पाहणार आहोत.

पुरावा क्रमांप 48: जन्म आणि मृत्यू
मनुष्य जन्माला येतो तो रडण्याने. अर्थात् रडणे हे प्रत्येक वेळी, नेहमीच्या अर्थाने अतीव दु:खाचे म्हणता येणार नाही. पुष्कळदा त्यात किंचित् अस्वस्थता, छोटी तक्रार आणि एखाद्या वेळेला गंमतच असू शकते. काही असो. मनुष्यजात पहिला उद्गार “उं हां ऽऽ उं हांऽऽ “किंवा “अम्ंहा ऽ ऽ ऽ अम्हा ऽ ऽ ऽ “असा असतो. उलट मनुष्य अखेरचा श्वास ऐकतो, तोही ओंकारसदृश्य असू शकतो. आजारी मनुष्य तर कण्हत राहातो. बारकाईने ऐकले, तर ते कण्हणे कसे असते? “उं हं ऽ ऽ ऽउं ह ऽऽऽ उं ह ऽ ऽ ऽ “अशा काही प्रकारचे हे कण्हणे ॐकाराचा उच्चार नकळत करीत राहोत. म्हणजे जन्म, मृत्यू, जरा व्याधीमध्ये ओंकार निसर्गत:च बरोबर चालतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView