दासी चाचणी (नवजात शिशु ते अडीच वर्षाच्या बालकांसाठी)

Rs.520.00

चाचणीचे नांव: भारतीय अर्भकाची डेव्हलपमेंटल असेसमेंट स्केल (दासी)
वयोगट: ३ महिन्यापासून ते अडीच वर्षापर्यंत
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे १ तास
देणगीमूल्य: रु. ५२०/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२०/ १ / २

डेव्हलपमेंटल असेसमेंट स्केल्स् फॉर इंडियन इन्फन्टस् (दासी) ही स्टॅण्डर्डाइज्ड् चाचणी, नवजात शिशुंपासून ते अडीच वर्षापर्यंतच्या बालकांसाठी आहे. बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास, त्यांच्या वयोमानानुसार होतो आहे ना, याचे परीक्षण करणारी ही मानसशास्त्रीय चाचणी आहे.

ह्या चाचणीद्वारे, विकासाची दोन मुख्य अंगे - (१) मोटर डेव्हलपमेंट आणि (२) मेंटल फंक्शनिंग (मानसिक कार्ये) यांचे एकाचवेळी पण स्वतंत्रपणे, परीक्षण केले जाते.

मोटर डेव्हलपमेंटच्या अंतर्गत मान धरणे, वळणे, पालथे पडणे, धरुन उभे राहाणे, चढणे इ. गोष्टी येतात. त्याचबरोबर कौशल्यपूर्ण वर्तन-क्रियांची नोंदही त्यामध्ये केली जाते; उदाहरणार्थ, एखाद्या वस्तुपर्यंत पोहोचणे, वस्तु उचलणे, हाताळणे, योग्य तर्‍हेने ठेवणे किंवा फेकणे इत्यादी.

मानसिक विकासाच्या बाबींमध्ये सभोवतालच्या वातावरणातील वस्तुंची दखल घेणे, हालत्या वस्तुंचा मागोवा घेणे, ऐकणे, वस्तुंचे बारीक निरीक्षण करुन त्या अर्थपूर्ण रितीने हाताळणे यांची नोंद घतली जाते. तसेच संवाद साधणे आणि भाषा कळणे, जागेतील बदल लक्षात येणे, हस्तकौशल्य, अनुकरण, सामाजिक कौशल्य इत्यादी बाबीही पाहिल्या जातात.

या निरीक्षणांवर आधारित बालकाचा विकासांक काढून, तो पालकांना सांगितला जातो. तसेच गरजेनुसार, बाळाची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी मार्गदर्शनही केले जाते.

महत्वाची सूचना:

• चेक-आउट पानावरील ऑर्डर कॉमेन्टसच्या चौकोनात, चाचणीची तारीख आणि वेळ, आठवणीने, टाइप करा.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView