यशाची साप शिडी

Rs.55.00
यशाची साप शिडी

यशाची साप शिडी
भाषा:- मराठी
देणगीमुल्य:- रू. ५५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘साप-शिडी’ हा खेळ सगळयांनाच आवडतो. सापाच्या तोंडातून खाली यायचं आणि शिडीवरून भरभर वर जायचं, असा हा खेळ. पण हाच खेळ आपल्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक-मित्रही बनू शकतो. त्याकरिता, मनशक्तीने ‘यशाची सापशिडी’ हा अभिनव खेळ तयार केला आहे.

ह्या खेळाची मूळ सुरुवात, संत ज्ञानेश्वरांच्या काळात झाली. ‘मोक्ष-पट’ असे त्याचे नाव होते. शिडी म्हणजे ‘गुण’ आणि साप म्हणजे ‘दोष’, शिडी म्हणजे ‘सत्कर्म’ आणि साप म्हणजे ‘दुष्कर्म’. त्या काळी, शिष्यांना चांगले संस्कार देण्यासाठी, गुरु, मोक्ष-पटाचा वापर करीत असत.

विद्यार्थ्याना चांगल्या आणि वाईट कर्माचं ज्ञान खेळ-मनोरंजनातून देण्यासाठी, त्यांना वागणुकीचे नियम करमणुकीद्वारे शिकवण्यासाठी, मुलांचा भावनिक विकास साधण्यासाठी, तसेच, गुण-दोषांचे ज्ञान देण्यासाठी, ह्या ‘यशाच्या सापशिडीचा’ खूप चांगला उपयोग होईल.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView