त्रिशक्ती

Rs.50.00
त्रिशक्ती

त्रिशक्ती
घटक:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. ५०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

प्रामुख्याने कडूलिंबापासून तयार केलेलं, बहु-उपयोगी व केवळ अप्रतिम असं हे रसायन आहे! दंतशुध्दी, पोटाच्या अनेक तक्रारी, त्वचाशुध्दी व मस्तकशुध्दी यावर, त्रिशक्ती अतिशय गुणकारी ठरते. लहामोठ्या सर्वांनाच, शुध्दी-शक्ती देणारी अशी ही त्रिशक्ती आहे.

चांगले आरोग्य हे मुखशुध्दी आणि पोटाची शुध्दी यावर अवलंबून असते. शरीराची त्वचा हा तर बाह्य भागाचा त्राताच असतो. या सर्वांवर आयुर्वेदाने आणि निसर्गतज्ञांनी एक अप्रतिम वनस्पती सांगितली आहे. ती म्हणजे नीम, लिंब, कडूलिंब. तुम्ही याचा उपयोग घरीही करू शकता. त्यात मेहनत बरीच आहे, हे बरोबर आहे. परंतु पैसे वाचवायचे असतील, तर स्वावलंबी अभ्यास व कष्ट याशिवाय उपाय कोणता?

मुलाचा मेंदू, बुध्दि शुध्द रहावी या दृष्टीने ‘वेखंड’ ही उपाय योजना वापरली जाते. मनशक्तीच्या ‘हेल्थ न्यू वे’ आणि ‘ग्राम सेवा समिती’तर्फे, प्रयोगकेंद्राच्या खास जागेत, प्रयोगाला आवश्यक अशा वनस्पती वाढवल्या जातात. त्याचे मिश्रण इतर वनस्पतीत योग्य तऱ्हेने केले जाते. ‘त्रिशक्ती’ या नावाने ह्या वनस्पती एकत्र केल्या जातात. त्रिशक्तीचे उपयोग असे:-

अ. दंतशुध्द शक्ती:- ही वनस्पती कडू आहे. गोड पेस्ट आणि पावडरचे दुष्परिणाम तीन पिढ्यांनी एकमेकांच्या कवळ्या सहन केले आहेत. पण अनुभव असा आहे की, बहुतांश शुध्दीकारक औषधे कडू असतात. हे लक्षात घेतल्यावर तरी, या किंचित् चवीत कडू असलेल्या औषधाने दात घासयला सुरुवात करा. चार दिवसात त्याच उपयोग गोड वाटायला लागेल. मुले आणि मोठी माणसे, दाताच्या एका विलक्षण आरोग्याचा अनुभव घेतात. कडूलिंबप्रधान अशा या रसायनाचे पीतमधुर रक्षक आवरण हे एक नवेच वरदान आहे.

ब. पोटाचे विकार कमी करण्यासाठी:- ‘त्रिशक्ती’मधल्या वनस्पतीने, शरीरातला दुसरा किल्लां म्हणजे पोट, तो जिंकला जातो. बारीक-बारीक ताप, कडकी, यावर नीमप्रधान वनस्पती हे विशेष वरदान आहे. चहाचा एक चमचा वनस्पती, कपभर पाण्यात उकळावी. अर्धा उरेल तो काढा, दिवसात तीन वेळा घ्या. पोटाच्या अनेक तक्रारी दूर होतील.

क. त्वचाशुध्दी:- 200 मिलि खोबरेल तेलात, निम्मे पाकीट (50ग्रॅम) ‘त्रिशक्ती’ वनस्पती उकळावयाची. शिवाय त्या तेलाचा उपयोग, झोपेपूर्वी किंवा आंघोळीपूर्वी किंवा दोन्ही वेळा डोक्यात चोळण्यासाठी होऊ शकतो. तसेच अंघोळीपूर्वी सर्व अंगाला तेल लावण्यासही होऊ शकतो. शिवाय उरलेले अर्धे पाकीट म्हणजे 50ग्रॅम वनस्पती, 800 मिलि पाणी व 200 मिलि तेलात उकळावी. हे मलम त्वचा रोगावर उत्तम उपयोगी पडेल.

घटक:-
1. कडूनिंब:- 65.5%
2. त्रिफळा:- 13.79%
3. कूटज:- 19.4%
4. बाभूळ:- 13.0%
5. काडेचिराईत:- 0.11%

त्रिशक्ती:- १ पाकीट. पॅकेजिंग:- ८० ग्रॅम

देणगीमूल्य:- रु. ५०.०० कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसाठी आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView