शतावरी कल्प (२५० ग्रॅम)

Rs.160.00
शतावरी कल्प (२५० ग्रॅम)

शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
देणगीमुल्य:- रु. १६०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘शतावरी’ ही वनस्पती, बुध्दीवर्धक, उत्तम पित्तशामक व मेंदूला बल देणारी आहे. रस व शुक्र या शरीराच्या धारणेत महत्त्वाचे काम करणाऱ्या धातूंवर या रसायनाचा उत्तम प्रभाव पडतो. त्यायोगे उत्साह वाढून मेंदूला बल देण्याचे कार्य घडते. शतावरी कल्प ग्रंथोक्त पध्दतीने तयार केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात, शतावरी कल्प हे उत्तम प्रसन्नता देणारे टॉनिक आहे. त्याचे उपयोग असे:

1. विद्यार्थी:- आयुर्वेदिक ग्रंथात ‘शतावरी कल्पाचा’, ‘मेध्य’ (बुध्दिवर्धक) म्हणून उल्लेख आहे. अभ्यास चटकन् विसरणारी, चिडचिडी व किरकोळ शरीरयष्टीच्या मुलांसाठी, शतावरी हे बुध्दीवर्धन योगाच्या बरोबरीने घेतल्यास, ते अत्यंत परिणामकारक ठरते. ‘मनशक्ती’तर्फे केलेल्या प्रयोगातून, विशिष्ट गटाच्या मुलांसाठी, शतावरीचा बुध्दिवर्धक म्हणून बऱ्यापैकी उपयोग झाल्याचे आढळून आले आहे.

2. गर्भवती महिला:- गरोदर स्त्रीला उलटी, चक्कर, मळमळ व थकवा कमी होण्यास, तसेच पोटातील बाळासाठी शतावरी अतिशय उपयुक्त ठरते. बाळ जन्मल्यानंतर, आईने शतावरी घेत राहिल्यास, बाळाला आईचे दूध भरपूर उपलब्ध होण्यास मदत होते.

3. मोठ्यांसाठी:- पोटात जळजळ, पोट गच्च वाटणे, छातीत धडधड, इत्यादी पित्तासंबंधी त्रासांवर, अन्य औषधांबरोबर, शतावरी फार प्रभावी आहे.

शतावरी कल्प (२५० ग्रॅम):- १ डबा

देणगीमूल्य:- रु. १६०/- कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

सध्या फक्त भारतातच उपलब्ध.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView