आत्मभान कार्यशाळा

मनशक्ती प्रयोगकेंद्र आणि
कवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या संयुक्त विद्यमाने

आत्मभान कार्यशाळा

(१५ ते २५ वयाच्या युवक-युवतींसाठी २-दिवसीय निवासी कार्यशाळा)

वैशिष्ट्ये:

 • हृदयस्पर्शी संवाद
 • युवकांच्या उर्जेला सकारात्मक दिग्दर्शन
 • करिअर, आव्हाने, माध्यमे या सर्वांना सामोरे जाण्याचा विवेक
 • निसर्गरम्य परिसरात अभिव्यक्तीचा निखळ आनंद
 • मनशक्ती प्रयोगकेंद्र समाजातील युवक-युवती कर्तबगार व्हावेत, मानवी मूल्ये जपत त्यांचे स्वतःचे, कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचेही जीवन बहरावे, यासाठी गेली 40 वर्षे सेवाकार्य करत आहे. युवक आणि पालक यांच्यापर्यंत या सेवा पोचवण्याची माध्यमे आहेत: पुस्तके, शिबिरे आणि समुपदेशन. लाखोंनी याचा लाभ घेतला आहे.

  गेली 40 वर्षे अध्यापनाच्या निमित्ताने युवा पिढीशी सातत्याने संवादी राहिलेले एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून कवी व साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे हे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. नवी पिढी घडवण्यासाठी ‘मनशक्ती’ करत असलेल्या रचनात्मक कार्यात प्रा. दवणे यांचा सक्रीय सहभाग लाभला आहे.

  तरूण पिढीशी विविध तर्‍हेने संवाद साधत त्यांच्यातील सुप्त उर्जेला सकारात्मक दिशा मिळणे आवश्यक आहे. यासाठी ‘मनशक्ती’ आणि प्रा. दवणे यांचे संयुक्त पाऊल म्हणजे ही ‘आत्मभान कार्यशाळा’.

  आत्मभान कार्यशाळेविषयी
  ॥अनंत अमुची ध्येयासक्ती॥

  दवणे म्हणतात, ‘आजच्या युवकांमध्ये प्रचंड उर्जा आहे; पण दिशा हरवल्याने दशा होत आहे!’ ब्रेकिंग न्यूज, प्रसार माध्यमे, मार्केटिंग युगाचे भोवरे, पालकांची व्यग्रता, अपेक्षांचे ओझे या भोवर्‍यात ‘समृद्ध जीवना’चेही एक करिअर असते, याचा तरुणांना जणू विसर पडत आहे.

  म्हणून ‘जीवन’ हेच सूत्र घेऊन ‘आत्मभान’ देणारी कार्यशाळा प्रवीण दवणे घेणार आहेत. त्यात मनशक्तीचे सत्रही असेल. कार्यशाळेत मुख्यतः भर असणार आहे तो संवादावर. आयुष्याची अनमोलता, मनावरची दडपणे, भांबावलेपणातून निर्माण होणारी निराशा, पौगंडावस्थेतील भावनांची आंदोलने यावर युवकांशी मनमोकळेपणे बातचीत असेल. जीवनाला उभारी देणारी, ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् अशा’ हा दुर्दम्य आत्मविश्वास जागवणारी ही कार्यशाळा एका अर्थाने आत्मक्रांतीच्या दिशेने सशक्त पाऊल असणार आहे.

  वयोगट: १५ ते २५
  प्रवेश: ४० युवक/युवतीं
  स्थळ: मनशक्ती केंद्र, आगरवाडी रस्ता, चाकण, ता. खेड, जि. पुणे
  व्यवस्थामूल्य: रु. १०४०/-
  चाकण संपर्क: ९०११२५७९७९ (अजित फापाळे) / ९८५०६१०९७०
  लोणावळा संपर्क: ०२११४ - २३४३३० / २३४ ३८०

  पिढी ‘बिघडली’ असे म्हणणे, हे अर्धसत्य आहे. तिला घडवण्याची जिद्द गमावण्याचे कारण नाही, हे उरलेले अर्धसत्य आहे. - स्वामी विज्ञानानंद

AttachmentSize
AtmaBhan Karyashala Instructions.pdf197.31 KB

&nbsp

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView