मेंदूक्रांती कार्यशाळा

जन्मजात स्थिती, अनुवंशिकतेने घडलेल्या मेंदूला प्रयत्नांनी विकसित करता येईल का? निश्चिरत येईल. मुलाचे मूळ व्यक्तिमत्व आणि पालकांकडून होणारे पोषण यांच्या सूयोग्य मेळातून घडते एक परिपूर्ण व्यक्तिमत्व. याचा मेळ साधायला पालकांकडून सुरूवातीपासूनच योजनाबद्ध प्रयत्न व्हायला हवेत. आपलं मूल, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं भवितव्य, खूप चांगलं घडवायचंय, पण कसं? पालकत्वाच्या नेमक्या भूमिकेचं उत्तम विश्लेषण करणारी

मेंदूक्रांती कार्यशाळा.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये

  • मुलाची मनस्थिती, मेंदूस्थिती जाणून करण्याचे उपाय
  • मुलाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा
  • मेंदूस्पर्श, एकाग्रता प्रार्थना प्रयोग, मित्र, शाळा इ. माध्यमातून होणारा सामाजिक विकास
  • भावनाकांचे महत्त्व
  • बहुविध बुद्धिमत्ता कशी मिळविता येईल.

मुलांची प्रगती आणि पालकांची स्वप्न यांचा सुयोग्य मेळ सहज साधत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मनशक्तीच्या अभिनव संशोधनातून आलेले प्रभावी उपाय तुमच्याही मुलाची मेंदूक्रांती घडवतील.

मुले लहान आहेत; त्यांना काय कळते? हा विचार प्रत्येक पालकाने मनातून काढून टाकला पाहिजे. प्रौढांपेक्षा बालकाचा मेंदू कित्येक पटीने ग्रहणक्षम असतो. मूल बोलण्यातून सगळ्या गोष्टी व्यक्त करू शकत नाही, म्हणून आपल्याला त्यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज येत नाही. सभोवतालच्या प्रसंगांचे बारकाईने निरीक्षण करून स्वत:च्या पद्धतीने निष्कर्ष काढत, मुले मनात सर्व साठवून ठेवतात. १ ते७ वर्षे वय हा काळ व्यक्त करण्यापेक्षा ग्रहण करण्याचा असतो.

मुलांनी कशाचे निरीक्षण करावे आणि त्यापासून काय शिकावे, याबाबत जागरूक पालक योग्य प्रयत्न करू शकतात. पालकांच्या या प्रयत्नांना दिशा देणारे मार्गदर्शन या कार्यशाळेत असते.

देणगीमूल्य : रु. ६२५/- प्रति व्यक्तीस

&nbsp

मेंदूक्रांती कार्यशाळा - 26/01/19 सोलापूर 26/01/2019 शिल्लक श्री. सिनगारे - ९८५०९९८७९९, श्रीमती. मोडक - ७७०९०७७६९१ Add to Cart
मेंदूक्रांती कार्यशाळा - 27/01/19 पंढरपूर 27/01/2019 शिल्लक श्री. ठाकरे - ९८२२२८३७०६, श्री. मिलिंद सुर्वे - ८८८८४५१४७० Add to Cart
मेंदूक्रांती कार्यशाळा - 10/02/19 खारघर 10/02/2019 शिल्लक ऑफिस - ९९६९९३८८५१, श्री. सुनिल पुळेकर - ८८७९४५०१६१ Add to Cart
मेंदूक्रांती कार्यशाळा - 19/02/19 नागपूर 19/02/2019 शिल्लक श्रीमती. नंदुरबारकर - ९३७०९९२४०८, श्रीमती. बोबडे - ९४२२०७७९०० Add to Cart
मेंदूक्रांती कार्यशाळा - 03/03/19 नाशिक 03/03/2019 शिल्लक श्रीमती देशमुख -९४०३११७४१२ , श्री. रवींद्र वैद्य - ९४२३९२४२१५ Add to Cart
मेंदूक्रांती कार्यशाळा - 10/03/19 बार्शी 10/03/2019 शिल्लक श्री. तिकटे - ९६०४१७०९०२, श्री. तवले - ९४२२०६७७७५ Add to Cart
मेंदूक्रांती कार्यशाळा - 24/03/19 बोरिवली 24/03/2019 शिल्लक श्री. देसाई - ९९६९०३६८९०, श्री. सनये ९८६९२६४२९९ Add to Cart

‘‘आजच मेंदूक्रांती या विषयावरील भाग अत्यंत सुंदर झाला. मुलांचे भवितव्य अधिक चांगले व सुखाचे करण्यासाठी अनेक सोप्या उपायांचे मार्गदर्शन मिळाले, सर्व साधकांचे अगत्य व सेवा खूपच नम्र व छान होती. एक पॉझिटिव्ह शक्ती घेऊन आम्ही सर्व इथून बाहेर पडू याची खात्री आहे.’’ - श्रीम. रोशनी प्रभात सुर्वे, रत्नागिरी

‘‘आजच्या मेंदूक्रांती कार्यशाळेचा मला फारच फायदा झाला. विशेष म्हणजे इ.क्यू. आणि एस्.क्यू. वाढविण्याचे हे उपाय मी जरूर माझ्या दोन्ही मुलांसाठी उपयोगात आणीन. न्यूरोबिक्स हा ब्रेन एक्सरसाईज प्रकार देखील फारच सोपा व उपयुक्त वाटला. याचाही माझ्या मुलांसाठी जरूर रोजच्या दैनंदिन जीवनात वापर करीत.’’ - श्रीम. स्वप्ना के. जाधव, पुणे

मेंदूक्रांती कार्यशाळा
मेंदूक्रांती कार्यशाळा
मेंदूक्रांती कार्यशाळा
मेंदूक्रांती कार्यशाळा

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView