सिकंदारची लायकी

Date: 
रवि, 1 डिसें 2013

पेरीलस हा अलेक्झांडरच्या म्हणजे सिकंदरच्या दरबारात अधिकारी होता. पेरीलसच्या मुलाचे लग्न ठरले होते. पेरीलस ऍलेक्झांडर बादशहाकडे गेला आणि त्याला म्हणाला, “माझ्या मुलीचे लग्न अडले आहे. मला दहा टॅलन्टस् हुंडा म्हणून द्यायला हवेत. “ग्रीक मापाप्रमाणे एक टॅलंट म्हणजे हजारो रूपये मूल्याएवढ प्रचंड माप होते, तरीसुध्दा ऍलेक्झांडर “ठीक आहे” म्हणाला आणि ऍलेक्झांडरने पन्नास टॅलन्टस् पाठविले, ऍलेक्झांडर एवढे औदार्य दाखविल, असे पेरीलसला वाटले नव्हत. तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “महाराज, मला दहा टॅलेन्टस् पुरेत. माझा मान राखण्यासाठी दहा टॅलेन्टस् पुरतील. “ ऍलेक्झांडरने ताबडतोब उत्तर दिले, “तुझा मना रहाण्यासाठी दहा टॅलेन्टस् पुरतील. पण माझा मान रहाण्यासाठी पुरणार नाहीत. माझा मान रहाण्यासाठी पन्नासच द्यावयास हवे.”
ऍलेक्झांडर बादशहला आपण सिकंदर बादशहा म्हणतो; सिकंदरपणाची पदवी औदार्याने मिळू शकते, सत्कृत्याने मिळू शकते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView