ताणमुक्त अभ्यासयश पाठमाला

लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात, विद्यार्थ्यांसाठी विविध शिबिरे घेतली जातात. पण अनेकजण लोणावळ्याला येऊ शकतातच असे नाही. त्यामुळे मुख्य केंद्रातील शिबिराचे संक्षिप्त स्वरूप म्हणून, मनशक्तीतर्फे एक दिवसाची विनामूल्य ‘ताणमुक्त अभ्यासयश पाठमाला‘ विविध ठिकाणी घेण्यात येते. बालकल्याण आणि सेवाकार्य याचा मेळ घालणारा हा उपक्रम आहे. त्या त्या ठिकाणच्या शाळा-कॉलेजने याचे आयोजन करायचे असते. मनशक्ती केंद्रातर्फे, पूर्वनियोजनाने, प्रशिक्षित आणि अनुभवी साधक या पाठमाला घेतात. त्यामध्ये, विद्यार्थ्यांसाठी निश्चय, नियोजन, एकाग्रता यांचे महत्व सांगितले जाते. तसेच मेंदूशास्त्र आधारित अभ्यासाच्या विविध पद्धती सांगितल्या जातात. शिक्षक आणि पालकांसाठी, विशेष मार्गदर्शनपर बैठकही यावेळी घेतली जाते.

&nbsp

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView